*देवदर्शनावरून आलेल्या तरुणांनावर काळाचा घाला*

*खर्डा रोड बटेवाडी शिवारात भिषण अपघात, 2 जण ठार*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड पोलीस ठाणे हद्दीत जामखेड खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात, कोल्हे पेट्रोल पंपाजवळ, ता जामखेड येथे जामखेड कडून खर्डा कडे जाणारी एस टी बस क्रमांक MH 09 FL 1027 (कोपरगाव ते हैदराबाद) (चालक सचिन विष्णू राऊत, वय 38 वर्षे, बॅच न 8551, कोपरगाव आगार ) या बसचा आणि खर्डा कडून जामखेड कडे येणारी Cherolet शेरोलेट बीट कार क्रमांक MH 16 AT 6492 या वाहनांमध्ये अपघात झालेला आहे. सदर अपघातात शेरोलेट कार मधील 5 इसम हे जखमी झालेले आहेत.
त्यापैकी 3 गंभीर जखमी असल्याने त्यांचेवर पन्हाळकर हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल ला पाठविलेले होते. त्यापैकी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेले आहेत
यामध्ये मयत -विजय गंगाधर गव्हाणे, वय 24वर्षे,
पंकज सुरेश तांबे, वय 24 वर्षे


व गंभीर जखमी- मयूर संतोष कोळी, वय 18 वर्षे

तर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे उपचाराकरिता दाखल होऊन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे गेलेले अपघातातील जखमी इसम -यांना रात्री साडेबारा वाजता
दाखल -00.30
Discharge – 04.30

4) सचिन दिलीप गीते, वय 30
5) अमोल बबन डोंगरे, वय 28
अनुक्रमांक 4 व 5 यांची प्रकृती स्थिर आहे.
*हे सर्व राहणार – वडगाव गुप्ता, MIDC, नगर

हे सर्व तरुण देवदर्शनाला तुळजापूर येथे गेले होते परत येत असताना हा भिषण अपघात झाला असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर दोन जनावर उपचार सुरु आहे.

यामध्ये मयत इसम यांचे इंटरेस्ट पंचनामे करण्यासाठी पोलीस हवालदार कदम व इंगळे केला आहे व
एसटी चालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

अपघातातील जखमींना संजय कोठारी यांची मदत रात्री बारा वाजता देखील उठून सर्व जखमी व्यक्तींना हॉस्पिटल मध्ये ऍम्ब्युलन्स मध्ये आणून ऍडमिट केले.

 

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री वाखारे साहेब, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी भेट दिली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *