जामखेड प्रतिनिधी –

ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी तब्बल ४५ वर्षांनी आले एकत्र

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ४५ वर्षांनी एकत्र येत या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.काही सुखावणारे तर काही भावूक करणारे क्षण यानिमित्ताने पाहायला मिळाले. ल.ना. होशिंग विद्यालयाच्या १९७८/१९७९ नंतर हे माजी विद्यार्थी प्रथमच तब्बल ४५ वर्षानंतर एकत्र आले होते.

ल. ना. होशींग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत हौसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्नेहमेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे , पारस बोथरा , अनिल कांकरिया,अशोक निमोणकर, नासीर पठाण, नासिर सय्यद उपस्थित होते.

शालेय मित्रांनी एकत्रपणे भेटावे या संकल्पनेतून माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, चंद्रशेखर कुलकर्णी , जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख, रवींद्र कुलकर्णी, संजय बोरा ,कासम शेख,
बजरंग डोके, लक्ष्मीकांत देशमुख आदींनी स्नेहमेळावा घेण्यासाठी पुढाकार घेतला. या स्नेहमेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करून ५२ आजी, आजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले.

दरम्यान शाळेमध्ये सवाद्य मिरवणूक काढून नेहमीप्रमाणे प्रार्थना घेण्यात आली. नंतर खेळ घेण्यात आले. गुरुजनांचे पाद्यपूजा करून त्यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी चांदेकर सर, कल्याणकर सर, ढगे सर, डी.बी .कुलकर्णी सर, लोढा मॅडम, खान मॅडम या सेवानिवृत्त शिक्षकांचे पाद्यपूजन चंद्रशेखर कुलकर्णी ,संजय बोरा ,डॉक्टर सुनील कटारिया ,रवींद्र कुलकर्णी ,सुमती भालेराव, जया महामुनी, निर्मला पितळे. रेखा गुंदेचा , बजरंग डोके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक चांदेकर सर म्हणाले, वयाच्या साठ वर्षात पदार्पण करत असल्याने, तुम्ही स्वतःसाठी जगा, मुलांमुलींच्या, सुनांच्या मध्ये मध्ये करू नका. चांगलं जगायचं असेल तर स्वतःसाठी जगा तब्येतीची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य श्रीकांत होशींग म्हणाले, माजी विद्यार्थ्यांनी आज ४५ वर्षांनी वाजत गाजत शाळेच्या प्रांगणात पदार्पण केले. यावेळी मी भावुक झालो असल्याची भावना व्यक्त केली.

स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, चंद्रशेखर कुलकर्णी, संजय बोरा यांनी परिश्रम केले. तर सूत्रसंचालन व आभार लक्ष्मीकांत देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *