जातेगावमध्ये २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील जातेगावमध्ये वैभव मारूती गायकवाड (वय २३ ) याने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जातेगाव येथील वैभव मारूती गायकवाड हा सुशिक्षित बेरोजगार तरुण होता. नोकरी नाही म्हणून शेती करत होता.
आज सकाळी वैभव आपल्या रूममध्ये गेला आणी नैराश्यामुळे घर बंद करून घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.
वैभव हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. आई वडील, एक भाऊ, बहिण व आजीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती.