क्षेत्र कोणतेही असो आपण जर त्या क्षेत्रात यशस्वी झालो तर आपला सर्वत्र सन्मानच होतो : डॉ. संजय भोरे
जामखेड प्रतिनिधी,
क्षेत्र कोणतेही असो आपण जर त्या क्षेत्रात यशस्वी झालो तर आपला सर्वत्र सन्मानच होतो. याचा चांगला अनुभव नांदेड जिल्ह्य़ातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँकेच्या वतीने झालेल्या सत्कारामुळे आला.
त्यामुळे आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत नवजीवन मेडीकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन (पाडळी) चे अध्यक्ष डॉ.संजय भोरे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील नवजीवन मेडीकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन (पाडळी) चे अध्यक्ष डॉ. संजय भोरे, प्रा. विनोद बहीर, प्रा. तेजस संजय भोरे हे नांदेड भेटीवर आले असता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँक मर्यादीत जिल्हा नांदेडच्या जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
त्या वेळी त्यांचा सहृदय असा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी बँक मर्यादित जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा नांदेड जिल्हा शिक्षण पतसंस्थेचे माजी सचिव तथा विद्यमान संचालक, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोणे,
नांदेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही.बी.कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ. को. ऑप क्रेडिट सो. लि.चे सचिव तथा पदवीधर शिक्षक निलेश गोधने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ को ऑप .केडिट सोसायटीचे सल्लागार सदस्य जितेंद्र गवळे, व्यवस्थापक प्रकाश चंद्रे, रोखपाल यशवंत हणमंते, लिपीक तथा तंत्रस्नेही राजेश वाघमारे, मुगावतांडा आश्रमशाळाचे मुख्याध्यापक गौतमराव गवळे, अशोकराव पंडीत ( मुख्याध्यापक बाबानगर आ.) भोकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजय भोरे यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.