*अखेर जामखेड ते लेहनेवाडी शिव रस्ता अखेर खुला,आता 15 एकर मध्ये होणार जामखेडचे मार्केट यार्ड*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड: कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड यांनी १५ वर्षा पूर्वी घेतलेली १५ एकर जागा प्रशस्त मार्केट यार्ड करिता घेतली होती या जागेसाठी रस्त्याची सोय नसल्यामुळे जवळपास १५ वर्ष रस्त्याआभावी जागा पडीक होती.

रस्त्याची अडचण लक्षात येताच नवनिर्वाचीत सभापती पै .शरद दादा कार्ले व उपसभापती श्री.कैलास वराट व सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्न केले. जामखेड ते लेहनेवाडी शिव रस्ता खुला करणेकामी मा. तहसीलदार साहेब जामखेड यांच्या कडे पाठपुरावा करून सदर जागेच्या बाजूच्या सर्व दहा गटांची मोजणी करून रस्ता खुला करण्यात आला.

सदर बाजार समितीच्या १५ एकर जागेमध्ये कांदा मार्केट , लिंबू मार्केट तसेच वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, सेल हॉल इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या प्रसंगी आमदार प्रा.राम शिंदे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पै. शरद दादा कार्ले, उपसभापती कैलास वराट, मा.तहसीलदार योगेश चंद्रे साहेब, ‌सर्कल माने साहेब, संचालक गौतम अण्णा उतेकर, नंदकुमार आबा गोरे, विष्णू आबा भोंडवे, डॉ.गणेश जगताप डॉ. सिताराम ससाने रवींद्र हुलगुंडे, पं.स.मा.सभापती डॉ. भगवान मुरूमकर, जि.प सदस्य श्री. सोमनाथ पाचरणे, केशव , नगरसेवक अमित चिंतामणी, अ‌ॅड. प्रवीण सानप , लहू शिदे,चौगुले साहेब व ज्या शेतकरी बांधवांनी रस्त्यासाठी जमीन मोकळी करून दिली

असे आदरणीय चंद्रकांत राळेभात, अरुण , राजेंद्र राळेभात, अंबादास राळेभात, दिनेश जगताप, संजय खेत्रे , दादासाहेब मगर, प्रवीण राळेभात व अण्णासाहेब मगर तसेच संबंधित शेतकरी बांधव व श्री सय्यद वाहेद सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड या प्रसंगी उपस्थित होते.

तसेच आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २.५० किमी रस्ता  करण्याचे घोषित केले या मुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढच्या काळामधे जामखेड तालुक्यातील शेतकर्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजारसमिती च्या माध्यमातून सर्व प्रयत्न केले जातील अशी असे अवहान सभापती पै. शरद कार्ले यांनी शेतकर्याना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *