अडीच वर्ष फक्त भुलवाभूलवी केली,विरोधकांनी पाणीपुरवठा योजना मंजूर नसताना उद्घाटन केले- राम शिंदेचा रोहित पवारांना टोला.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी मी राज्याचा मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री असताना उजनी वरून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी पक्षाचा नगराध्यक्ष अर्चना सोमनाथ राळेभात असताना ठराव केला. तसेच पैसेही भरले त्यामुळे या योजनेला सुरुवात झाली.
आता प्रत्यक्षात काम सुरू झालेले आपण पाहतोय. येणाऱ्या वर्षात या योजनेच्या पाईपलाईनद्वारे जामखेडला शुद्ध व मुबलक पाणी मिळेल. तसेच या योजनेचे शहरात पाईपलाईन होण्यासाठी शहरातील ड्रेनेज होणे गरजेचे असल्याने नगरपरिषदेकडून यासाठी कार्यवाही सुरू आहे. अशा पद्धतीने मिशन मोडवरती एका वर्षात एका मार्गी लावण्याचे सूचना मी संबंधित प्रशासन व कॉन्टॅक्टर देखील दिलेल्या आहेत. पुन्हा आपण याबाबत आढावा बैठक घेऊन काम अतिशय गतीने झाले पाहिजे यासाठी काम करूया.
कारण पाच वर्षे लोकांनी याची वाट पाहिली आहे. आता आणखी वाट पाहण्याची वेळ येऊ नये म्हणून लवकरात लवकर ही पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात होईल याबाबत येणाऱ्या सर्व अडचणीसाठी शासन, प्रशासन व मी स्वतः लक्ष ठेवून आहे असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले
उजणी धरणातून जामखेड शहराला येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून जामखेड शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात आ. प्रा. राम शिंदे यांनी या कामाची पाहणी केली.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, बिभीषण धनवडे, बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे, सरपंच महारुद्र महारनवर, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचारणे, लहु शिंदे, सलीम तांबोळी, आण्णा ढवळे, अभिजीत राळेभात, प्रविण बोलभट, अर्जुन म्हेत्रे, मोहन गडदे, मोहन देवकाते, कैलास महाराज नेटके, संपत राळेभात, सलीम बागवान, जमीर सय्यद, प्रशांत शिंदे, अँड प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अल्ताफ शेख, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, सुनील यादव, मोहन गडदे, अशोक महारनवर, संतोष तोष गव्हाळे, बिटू मोरे यांच्या सह इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे मोनैश गुरूबक्स साहानी, अभियंता अनंतकुमार घोडेस्वार यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले की, जामखेड पाणीपुरवठा योजना कार्यारंभ आदेश देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे महाजनादेश यात्रेत दिला होता. आता कामाला सुरुवात झाली आहे. पाच वर्षे पाण्याची प्रतिक्षा करावी लागली. आता वर्षभरात पाणीपुरवठा योजना पुर्ण होईल व जामखेडकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल असे शिंदे यांनी सांगितले.विरोधकांनी पाणीपुरवठा योजना मंजूर नसताना उद्घाटन केले होते. अडिच वर्षे फक्त भुलवाभुलवी केली. अशी टिका आमदार रोहित पवार यांचे नाव घेता केली. जामखेड नगरपरिषद अंतर्गत शहर व वाड्या वस्तीसाठी १८९.९८ कोटी रुपयांची ६८ किलोमीटर पाणीपुरवठा योजना आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुदत दोन वर्षे आहे. तरी वर्षभरात योजना पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच जामखेड पाणीपुरवठा योजनेत जलशुद्धीकरण केंद्र एक ठिकाणी व पाच ठिकाणी टाक्या बांधण्यात येणार आहेत. विकासनगर बीडरोड, गोल्डन सिटी, जमादारवाडी, भुतवडा, लेहनेवाडी या ठिकाणी टाक्या होणार आहेत.