*कुसडगांव चे राष्ट्रवादी चे सरपंच व सोसायटी चेअरमन यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यामध्ये महत्त्वाची मानली जाणारी कुसडगाव ग्रामपंचायत सरपंच अंकुश कात्रजकर व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.केशव अण्णा कात्रजकर व संचालक श्री.निळकंठ कात्रजकर श्री.वसंत कात्रजकर श्री.हनुमंत टिळेकर युवा नेते श्री.धनंजय राऊत श्री.नाना कात्रजकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आ.प्रा.राम शिंदे साहेब व सभापती पै.शरद कार्ले यांच्या हस्ते झाला.
एक युवक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी यात्रा काढतोय आणि मतदार संघातले युवा भाजपा मध्ये प्रवेश करतायत हे चित्र कर्जत जामखेड मतदार संघामध्ये दिसत आहे. प्रा.राम शिंदे साहेब मंत्री असताना केलेली विकास कामे रस्ते, बंधारे, जलसंधारण, सभामंडप, शाळे करिता ब्लॉक अशा विविध विकास कामांसाठी साहेबांनी निधी दिला. परंतु सरकार बदलले व आ.रोहित पवार यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये गावमध्ये कुठल्याही विकास कामांसाठी निधी दिला नाही, जी कामे केली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची केली.
तसेच शिंदे साहेब आमदार असताना राज्य राखीव पोलीस दल याचा ठराव ग्रामपंचायत ने करून दिला होता व त्याच्या माध्यमातून हे ट्रेनिंग सेंटर व्हावे यासाठी साहेबांनी पाठपुरावा केला होता आणि आज त्याचेच प्रत्यक्षामध्ये काम देखील चालू आहे त्यामुळे गावातील बऱ्याच युवकांना फायदा होताना दिसत आहे याचे संपूर्ण श्रेय आ राम शिंदे साहेब यांना देत असून इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत निष्ठेने व खंबीरपणे उभे राहून पक्ष बळकट करण्याचे आश्वासन सर्व कार्यकर्त्यांनी दिले.
प्रसंगी उपस्थित भानुदास अण्णा टिळेकर सोसायटीचे संचालक दिलीप गंभीरे ग्रामपंचायत सदस्य युवराज गंभीरे युवा नेते राम टिळेकर संतोष टिळेकर अशोक गंभीरे विठ्ठल कात्रजकर प्रवीण कार्ले, चंद्रकांत कार्ले, आशिष कार्ले, अमोल कार्ले, बंडू कार्ले, मंगेश कार्ले, शुभम कार्ले, राहुल पवार, नाना कात्रजकर,सागर काकडे, आशिष कार्ले, निलेश कार्ले, भाऊसाहेब कार्ले, आदी उपस्थित होते.