मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने मंत्री. छगन भुजबळ यांच्या प्रतिमेस चपलांचा हार व जोडे मारुन केला निषेध
मनोज जरांगे पाटिल यांच्या विरोधात केले होते बेताल वक्तव्य
जामखेड प्रतिनिधी
जालना जिल्ह्य़ातील अंबड या ठिकाणी काल ओबीसींच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटिल यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले होते. यामुळे मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच जामखेड येथे देखील सुरू आसलेल्या साखळी उपोषणा दरम्यान मराठा क्रांती मोर्चा जामखेड व नाहुली येथील ग्रामस्थांच्या वतीने मंत्री. छगन भुजबळ यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून व जोडे मारुन केला निषेध व्यक्त केला.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली होती. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांच्यावर भुजबळ यांनी टीकास्त्र सोडलं. तसेच मनोज जरांगे पाटिल यांच्या विरोधात भर सभेत बेताल वक्तव्य केले होते. जामखेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा पंचवीसावा दिवस आहे. या साखळी उपोषणात नाहुली येथील मराठा बांधव व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
मंत्री छगन भुजबळ यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून जामखेड येथे देखील सुरु असलेल्या साखळी उपोषणा दरम्यान मराठा क्रांती मोर्चा जामखेड व नाहुली येथील मराठा बांधवांच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेस प्रथम स्टेज समोरच गळफास देण्यात आला. यानंतर त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून नंतर जोडे मारुन त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
याच घटनेच्या निषेधार्थ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तर महाराष्ट्रातील मराठा बांधवांन कडुन देखील मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनामा देण्याची मागणी वाढु लागली आहे. जोडो मारो आंदोलना दरम्यान मराठा क्रांती मोर्चा जामखेड चे मराठा बांधव व सरपंच सचिन घुमरे, नाहुली येथील विजय मोरे, नितीन घुमरे, भिमराव बहीर, देवराव जाधव, सुरेश बहीर, राजेश बहीर माऊली बहीर आण्णासाहेब बहीर, विश्वजित घुमरे, सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.