जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात कीत्येक वर्षापासून शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाहीत. दुधाला भाव व कांदा निर्यात उठवली पाहिजे, आधिकाऱ्यांनो शेतकर्यांचे रक्त पिण्याचे काम बंद करा आन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश दादा आजबे यांनी रास्तारोको आंदोलना दरम्यान दिला आहे.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाला शेतकर्यांचा आक्रोश दिसावा यासाठी आज दि २७ डिसेंबर रोजी सकाळी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील खर्डा चौकात भव्य असा आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलन करण्यात आले या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, भिमराव पाटील, काकासाहेब चव्हाण, गणेश हगवणे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नय्युम शेख मा. सरपंच कृष्णा चव्हाण, बापुसाहेब शिंन्दे, मा. सरपंच निलेश पवार, दत्तात्रय साळुंके यांच्या सह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मंगेश आजबे म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा. मार्केट कमिटीच्या बाहेर आडती चालतात त्यांना बाजार समितीमध्ये जागा देण्यात यावी तसेच आडत दुकानांन मध्ये काटा मारण्याचे काम होत आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे. कृषी विभागाकडुन शेततळे होत नाहीत. गावातील ग्रामपंचायत मध्ये संबंधित शासकीय कर्मचार्यांच्या ग्रामपंचायत बोर्डवर नाव व मोबाईल नंबर टाकावा. ठीबक सिंचन कादाचाळ आनुदान चालु करावे.
पशुवैद्यकीय अधिकारी यांचे औषधे व शासकीय गुरांच्या डॉक्टरांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे ती उठवण्यात यावी, दुधाचे भाव उतरले व दुध भेसळ वाढली आहे त्यामुळेच शेतकर्यांच्या दुधाला भाव मिळत नाही, तालुक्यातील खाजगी कॉन्ट्रॅक्टर कडुन होणारी वीज संदर्भातील शेतकर्यांची लुट थांबली पाहिजे.
यानंतर विविध आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले की जामखेड नगरपरिषद हद्दीतील वाड्या वस्त्या मधिल शेतकरी शासनाच्या विविध योजनान मधुन वगळले आहेत. त्यामुळे त्यांना कृषी व पंचायत समितीच्या योजना मिळत नाहीत या योजना त्यांना त्वरीत लागु कराव्यात शेतकर्यांचे वाटोळे विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने केले आहे. शेतकरी मुजाराला सुध्दा विमा योजनेत घेतले पाहिजे. जामखेड तालुक्यातील मागिल वर्षीचे तालुक्यातील ३४ गावे ही आनुदाना पासुन आजुनही वंचित राहीले आहेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यानंतर शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार मनोज भोसेकर व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलनात मागे घेण्यात आले या वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.