जामखेड तालुक्यात अत्तापर्यंन्त २६ हजार कुणबी नोंदी सापडल्या -तहसीलदार योगेश चंद्रे
मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने ६२ दिवस चालू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता संपन्न
जामखेड प्रतिनिधी
गेल्या ६२ दिवसापासून मराठा समाजाच्या बांधवांनी साखळी उपोषणासह आनेक मोर्चे व आंदोलने शांततेच्या मार्गाने करुन प्रशासनाला सहकार्य केले आहे. जामखेड तालुक्यात अत्तापर्यंन्त २६ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर यामधील मोडी लिपीतील सापडलेल्या १८ हजार कुणबी नोंदी या तपासणीसाठी जिल्ह्याच्या ठीकाणी पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी साखळी उपोषण सांगता कार्यक्रमात दिली.
पुढे बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की जामखेड तालुक्यातील कुणबी नोंदी तपासणी दरम्यान ८ हजार तर १८ हजार कुणबी नोंदी या मोडी लिपीत आपल्या आहेत. मोडी लिपीतील सापडलेल्या कुणबी नोंदी या तपासणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत. जामखेड तालुक्यात अत्तापर्यंन्त नगर जिल्ह्य़ातून सर्वात जास्त नोंदी जामखेड तालुक्यात आढळून आल्या आहेत आशी माहिती दिली.
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने गेली ६२ दिवस चालू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता आज मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी साखळी उपोषणा दरम्यान ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आशा पत्रकार व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे ,पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सभापती शरद कार्ले , अजय दादा काशिद, अवदुत पवार, केदार रसाळ, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, विकास (तात्या) राळेभात, संजय वराट, दत्तात्रय सोले, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल
श्री राम निकम (सर) रमेश आजबे, महेश यादव, डीगंबर चव्हाण, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ सुशिल पन्हाळाकर, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, प्रशांत राळेभात, विकास आजबे, आशोक घुमरे, जयसिंग उगले, विकास पवळ अनिल भोरे, सरपंच सागर कोल्हे, काकासाहेब चव्हाण, अमित जाधव यांच्या सह जामखेड तालुक्यातून रोज एक दिवस सहभागी झालेले सर्व गावकरी मंडळी
वारकरी,भजनी मंडळी, जामखेड शहरातील सर्व उद्योजक, अधिकारी, वकील , डॉक्टर , औषध विक्रेते, नोकरदार, कष्टकरी,शेतकरी, महिला, बालक, सेवा निवृत्त अधिकारी, पत्रकार व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.