मिशन आपुलकी अंतर्गत भोगलवाडी शाळेस एक लाख रुपये लोकसहभाग……

शाळेच्या पाणी सुविधेसाठी ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. बापूसाहेब कार्ले सरसावले

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा भोगलवाडी या शाळेच्या पाणी सुविधेसाठी *मिशन आपुलकी*

अंतर्गत 15 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत व श्री बापूसाहेब कार्ले यांनी तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने लोकसहभाग देऊन दातृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


*भोगलवाडी* शाळेस *कुसडगाव ग्रामपंचायतकडून 200फूट बोअर वेल* घेण्यात आला,परंतु पाणी कमतरते अभावी बोअर वेल खोली वाढविणे गरजेचे होते. शाळेतील शिक्षकांनी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली.*कुसडगाव भूमीपुञ युवा उद्योजक तथा कार्यकुशल राजकारणी बापूसाहेब कार्ले,उपसरपंच संतोष भोगल व ग्रामपंचायत सदस्य कल्याण वटाणे* यांनी शाळेच्या मदतीसाठी हात पुढे करत स्वखर्चातून 200 फूट बोअर वेल घेऊन दिला व मुबलक पाणीही लागले.


दानशूर व्यक्तिमत्त्व *बापूसाहेब कार्ले* यांनीही आपले दातृत्व दाखवत *स्वखर्चाने मोटार व इतर साहित्य* देण्याचे जाहीर केले.*जि.प.अहमदनगर कडून सुरु असलेल्या मिशन आपुलकी अंतर्गत* तब्बल *एक लाख रुपये वस्तूरुपाने* दिले.शाळेची पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत व श्री बापूसाहेब कार्ले यांनी केलेल्या या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

जामखेड तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,विस्तारअधिकारी सुरेश मोहिते साहेब,केंद्रप्रमुख नवनाथ बडे साहेब* यांनी या दानशूर ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.

शाळेचे *मुख्याध्यापक श्री. मोहन नेमाडे व श्री. संदिप गायकवाड* यांनी विद्यार्थी व शाळा हितासाठी प्रयत्नशील राहून शाळा विकासासाठी ग्रामस्थांचा उत्तम समन्वय ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *