जामखेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणास सर्व मुस्लीम समाजाचा जाहीर पाठिंबा….
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड तहसिल कार्यलय येथे साखळी उपोषण करणारे मराठा बांधवसाठी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या वेळी बोलताना खलील मौलाना म्हणाले की मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आणि या बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे मराठा समाज हा बहुतांशी शेती करत आहे परंतु या शेतीवर आनेक संकट येतात त्यामुळे समाजाचा अर्थिकस्तर खालावला आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक मागासलेपण दुर करण्यासाठी प्रथम आरक्षण मिळाले पाहिजे या देशात मराठा मुस्लिम यांच्या सामाजिक ऐक्याचा इतिहास आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व मुस्लिम समाजाचा मराठा बांधवांना पाठिंबा आहे.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण दरम्यान आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व आरक्षणासाठी मराठा बांधवांनी हिंसक आंदोलने करू नयेत समाजातील जातीयवादी शक्तींना ओळखले पाहिजे असे जे लोक आहेत ते हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधत आहेत
तसेच पहिले मराठा समाजाला आरक्षण द्यावे व नंतर मुस्लिम समाजाला मिळावे अशी मागणी त्यांनी या प्रसंगी केली आहे. यावेळी मोठय़ा संख्येने खलील मौलाना, जावीदभाई सय्यद, डाँ.सादेख पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमर कुरेशी, जमीरभाई सय्यद, अबरार कुरेशी, जुबेरखान, हाजी नादीरभाई, फर्मानभाई शेख, मुजिब अत्तार, चाॅद तांबोळी, आयुबभाई कुरेशी, शाबीर कुरेशी, अस्लम सय्यद, शेरखान चाचा, राजुभाई शेख आदी मराठा बांधव व मुस्लिम समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होते.