मराठा आरक्षणासाठी महीला उतरल्या रस्त्यावर, महीलांनी केला दोन तास रास्ता रोको
जामखेड प्रतिनिधी
संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथे सकल मराठा समाज महीला विभागाच्या वतीने शहरातील खर्डा चौकात भव्य असा रास्तारोको आंदोलनात करण्यात आले. यावेळी हजारो महीला या रास्तारोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्याच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावेळी रास्तारोको दरम्यान महीलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, मराठा आरक्षण मिळालं तर मराठ्यांना, त्यांच्या लेकरांना किंवा पुढच्या पिढीला मोठा फायदा होईल. ग्रामीण भागातील मराठा समाजाला आजही अनेक समस्याना तोंड द्यावं लागतं आहे, सरकारने नुकतीच सर्व पक्षीय बैठक घेतली मात्र या बैठकीत कसलाच निर्णय झाला नाही.
महाराष्ट्रात देखील मनोज जरांगे पाटिल यांना पाठिंबा देण्यासाठी महीला आक्रमक झाल्या आहेत त्यामुळे आम्ही देखील आज रस्त्यावर उतरत मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. एका रात्रीत सरकार बदलते ,एका रात्रीत मंत्री बदलतात मग मराठा आरक्षणाचे घोडे कुठे आडतंय असा सवाल करत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा निषेध व्यक्त केला. .
रास्तारोको दरम्यान खर्डा चौकात यावेळी महीलांनी कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय रहाणार नाही, एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या शेवटी संविधान उद्देशीकेचे वाचन करुन रास्तारोको ची सांगता राष्ट्रवादी म्हणून करण्यात आली. यावेळी रीपब्लीकन पार्टी च्या महीला अघाडी च्यावतीने पाठींबा देण्यात आला.
चौकट
डॉक्टर व मुस्लिम समाजाच्या वतीने साखळी उपोषणास पाठिंबा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड येथे वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणात तालुक्यातील साकत येथील मराठा बांधव यांनी सहभाग घेतला.
या साखळी उपोषणास जामखेड येथील न्यु जामखेड तालुका डॉक्टर असोशिएशन जामखेड, रायगड ग्रृप जामखेड व जामखेड तालुक्यातील मुस्लिम बांधव यांच्या वतीने भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.