” मतदान करा ” भव्य विद्यार्थी बैठक रचनेत नागेश विद्यालयात साकारले नाव…

जामखेड प्रतिनिधी :-

जामखेड तालुक्यामध्ये मतदान जनजागृती निमित्त भव्य कार्यक्रम उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार गणेश माळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य चित्रकला स्पर्धा व विद्यार्थी बैठक रचनेतील ‘मतदान करा’ हे नाव साकारण्यात आले तसेच या नावात विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगा हातात धरला.

हे नाव कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारले. विद्यार्थ्यांनी मतदान जागृती संदर्भात विविध घोषवाक्य व चित्र साकारले.
मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, माझे मत माझा अधिकार , यापुढे मतदान कर लोकशाही समृद्ध करा अशा घोषणेने परिसर दुमदुमून निघाला.

प्राचार्य मडके बीके यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे व जनजागृती करावी असे मनोगत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी नागेश विद्यालयाने मतदान जनजागृती संदर्भात अतिशय चांगला उपक्रम घेतला आहे.

‘मतदान करा ‘ हे नाव साकारून नगर जिल्ह्यातील अनोखा उपक्रम झाला आहे व चित्रकले स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. असे मनोगत केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब दानवे, प्राचार्य मडके बि के , परिवेक्षक कोकाटे व्ही के, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, एनसीसी ऑफिस मयुर भोसले, रघुनाथ मोहोळकर, गाडे पी एस ,डाडर बी एम,

सांगळे एम जामखेड तालुक्याचे स्विप टीम गांगर्डे पी एम ,सुरेश मोहिते, एकनाथ चव्हाण, केशवराज कोल्हे, प्रताप पवार, रवींद्र भापकर सिद्धनाथ कचरे व नागेश विद्यालयातील सर्व स्टाफ विद्यार्थी पालक उपस्थित होते.
या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *