माणुसकी जिवंत राहण्यासाठी ,विश्वशांतीसाठी दूआ:
जामखेडला दोन दिवसीय ईज्तेमा संपन्न :
तालुक्यात हिंदू ,मुस्लिम,भाई चारा कायम
जामखेड प्रतिनिधी
या जगाचा निर्माता एकच असुन माणुस जात एकच आहे .विश्वात शांती नांदो ,माणुसकी जिवंत राहो एकुणच मानव कल्याणासाठी व आपल्या देशाच्या कल्याणासाठी ईश्वराकडे इज्तेमा मध्ये मुस्लिम बांधवांकडुन प्रार्थना -दूआ करण्यात आली.यावेळी जामखेड येथील दोन दिवसीय ईज्तेमाला शेवटच्या दिवशी मौलाना मूबीनसाहब पूणे यांनी संबोधित संबोधित केले .
अहमदनगर जिल्ह्याचे इज्तेमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात येते.यावर्षी जामखेड कर्जत या दोन तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या वतीने दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते .जामखेड माहिजळगाव रोडवर १५ एकराच्या भव्य मैदानात इज्तेमाची व्यवस्था करण्यात आली होती. ११ वर्षानंतर जामखेड तालुक्याला इज्तेमाचे आयोजन करण्याची संधी मिळाली होती.
९ नोव्हेंबर पासुन १७ नोव्हेंबर पर्यंत या मैदानावर येणाऱ्यांसाठी याठिकाणी दोन भोजनालय,एक दवाखाना, ॲम्बुलन्सची व्यवस्था,चाहाचे स्टाॅल ,पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था,शौचालय,मूतारी ,पाणी आदी व्यवस्था करण्याचे काम कर्जत जामखेड तालुक्यातील मुस्लीम बांधव आहोरात्र करत होते .
इज्तेमा यशस्वी करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेड तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले.
कर्जत जामखेड तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील इज्तेमा च्या ठिकाणी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
–चौकट–
यावेळी आ.प्रा राम शिंदे यांनी इज्तेमास्थळी भेट दिली व्यवस्थेची माहिती घेतली .तसेच जामखेड कर्जत तालुक्यातील अनेक हिंदू बांधवांनी भेट दिली यावेळी हिंदु मुस्लिम भाईचारा कायम ठेवणारे दर्शन यावेळी घडले.