आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली इस्तेमास भेट, मुस्लिम बांधवांशी साधला संवाद !

जामखेड प्रतिनिधी,

मुस्लिम बांधवांकडून जामखेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या इस्तेमास आमदार प्रा.राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. जामखेड शहरात दोन दिवशीय इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत जामखेड मतदारसंघातील हजारो मुस्लिम बांधवांनी यात सहभाग घेतला.

अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी इस्तेमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी संपुर्ण जिल्ह्यासाठी एकाच ठिकाणी इस्तेमाचे आयोजन होते. परंतू यावर्षीपासून त्याचे स्वरूप बदलण्यात आले. यावर्षी जामखेड व कर्जत या दोन तालुक्यातील मुस्लीम बांधवांसाठी जामखेड शहरात वतीने दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड येथील कर्जत रोडवरील पंधरा एकर मैदानात या इज्तेमाची व्यवस्था करण्यात आली होती. 11 वर्षानंतर जामखेड तालुक्याला इज्तेमाचे आयोजन करण्याची संधी यावर्षी मिळाली होती.

इस्तेमाच्या शेवटच्या दिवशी (19 नोव्हेंबर 2023 रोजी ) राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी सायंकाळी इस्तेमास भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. आमदार प्रा.राम शिंदे हे इस्तेमाच्या ठिकाणी आले आहेत याची माहिती मिळताच तरूणवर्ग त्यांच्या भेटीस आतूर झालेला पहायला मिळाला. यावेळी आमदार राम शिंदे यांनी मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.

यावेळी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर काझी, माजी ग्रामपंचायत सदस्य कलिमुल्ला कुरेशी, हाजी जावेदभाई बारूद,जमीर बारूद, शाकीर खान, हबीब शेख, फय्याज शेख, उमर कुरेशी, शाहीर सय्यद, समीर पठाण, नासीर शेख, खिजर खान, आसिफ शेख, फय्याज कुरेशी, सह मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *