जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी जामखेड पोलिसांकडून अटकेत

जामखेड प्रतिनिधी,

१७ वर्षीय मुलीला जंगलात नेऊन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जामखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे . जामखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .
याप्रकरणी १७ वर्षीय तरुणीने जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती ,त्यानुसार आरोपी रियाज बालीश शेख रा. पिसोरे खांडगाव ता श्रीगोंदा जि. अहमदनगर याला अटक केली आहे .
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीस आरोपी रियाज शेख याने फिर्यादी अल्पवयीन पिडीत मुलीस त्यांचेकडील मोटारसायकल वरुन घेवून जात असताना गांव शिवारातील कृषी विद्यालया जवळील जंगलात घेवुन जावून गाडीवरुन खाली उतरवून तिचे हाताला धरून जवळ ओढुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिला म्हणाला की, ” मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करु”, त्यावर यातील फिर्यादी हिने आरोपीस तिला तिचे घरी हाळगाव येथे सोडण्याची विनंती केली.

तरी देखील आरोपी रियाज शेख याने फिर्यादीस दोन मिनीट थांब असे म्हणून परत फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून सदर १७ वर्षीय अल्पवयीन पिढीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रियाज बालीश शेख रा. पिसोरे खांडगाव ता. श्रीगोंदा याचे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता गिरी करत आहेत .

आरोपीला अटक करण्यास पोलीस नाईक अजय साठे व पोलीस कॉन्स्टेबल अडसूळ ,यांनी मोलाचे सहकार्य केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *