नागेश रयत संकुलाच्या वतीने प्रा मधुकर आबा राळेभात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य रा काँ महा. प्रदेश सरचिटणीस सन्माननीय राजेंद्रजी कोठारी ,ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले, प्रगतशील शेतकरी निमोनकर ,प्राचार्य मडके बी के कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे ,प्रा विनोद सासवडकर ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य मडके बी के यांनी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात हे नेहमीच विद्यालयाला सहकार्य करत असतात ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून अडचणीच्या काळात नेहमीच मागे उभा राहून विद्यार्थ्यांचे हिताचे निर्णय घेत असतात असे मनोगत व्यक्त केले. कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी प्रा मधुकर आबा राळेभात यांनी केलेले उल्लेख कार्य याची माहिती देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी आबा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून समाज हिताचे कार्य करतात असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी तालुक्यात संस्कारक्षम विद्यार्थी घडवले सामाजिक – धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. सर्वांना ते सहकार्य करत असतात, क्रीडा क्षेत्रात त्यांचे नाव उंचावलेले आहे . असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात सूत्रसंचलन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन प्राध्यापक विनोद सासवडकर यांनी केले.