नायगाव येथे मराठा आरक्षणासाठी टायर जाळून आंदोलन, तरुणाचा टॉवरवर चढुन आत्महत्याचा प्रयत्न
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा प्रश्न गंभीर होत आसतानाच तालुक्यातील नायगाव या ठिकाणी सकल मराठा समाज नायगावच्या वतीने टायर जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलन सुरू असतानाच नायगाव येथील एका तरुणाने मोबाईल टॉवरवर चढुन आंदोलन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी समजुत काढुन त्यास काही तासातच टॉवरवरुन खाली उतरवण्यात आले.
मनोज जरांगे पाटिल यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मंगळवार दि ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी सकल मराठा समाज नायगावच्या वतीने श्री नाथ मंदिरा समोर टायर जाळून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी नायगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलना दरम्यान एक दिवस लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले. आंदोलना दरम्यान एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे ,कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन सुरू असतानाच अचानक नायगाव येथील तरुण बाळासाहेब उगले याने टॉवरवर चढुन आंदोलन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी समजुत काढुन त्यास टॉवरवरुन खाली उतरवण्यात आले .
आंदोलना दरम्यान सकल मराठा समाजाचे भिमराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. झोपलेले सरकार कधी जागे होणार, काही पक्षाचे वाचाळवीर आरक्षणाच्या विरोधात काहीही बरळत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे आरक्षण मिळवुन देत नाहीत या मागचा मास्टरमाईड देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप केला.
या नंतर विनोद उगले यांनी बोलताना सांगितले की दि १४ तारखेला भुतोना भविष्य आशी सभा झाली सभा झाली तरी सरकारने याची दखल घेतली नाही. आता या पुढे मराठा समाजाच्या विरोधात बोलणार्यांच्या मुसक्या आवळणार आहोत वेळ पडली तरी घरासमोर आंदोलन करण्यात येईल .लवकरात लवकर आरक्षणाची घोषणा करावी अन्यथा ग्रामिण भागात देखील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.