राज्यकर्त्यांना तेरा वर्षात करता आले नाही ते निलेश भाऊंनी 24 तासात करून दाखवलं…
याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील पोतेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न गेली तेरा वर्षांपासून रखडला होता याबाबत पोतेवाडी करांनी व सरपंच प्रवीण पोते यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांच्याकडे शेवटचा प्रयत्न म्हणून या रस्त्याचा प्रश्न मांडला निलेश भाऊ यांनी या सर्व प्रश्नाचे अवलोकन केले व गावकऱ्या ंची खरीच अडचण आहे हे समजून घेतले व ज्यांनी इतके वर्ष रस्ता अडवला आहे, असे अंगद निवृत्ती सराफ व दत्तात्रेय निवृत्ती सराफ यांच्याबरोबर चर्चा केली व त्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता अवघ्या 24 तासात सर्वसामान्य माणूस व शेतकऱ्यांसाठी स्वतःचा जीसीबी, ट्रॅक्टर व मुरूम टाकून खर्च केला व एक सामाजिक बांधिलकी जपत हा रस्ता जाण्या येण्यासाठी खुला केला व पोतेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न कायमचा निकाली काढला, यामुळे सर्व ग्रामस्थ व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पोतेवाडी करांना दररोज नान्नज वरून पोतेवाडी फाटा ते पोतेवाडी गावात या रस्त्याचे अंतर साडेचार किलोमीटरचे होते तर आता सुरू महारुळी ते पोतेवाडी झालेला हा रस्ता अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे ग्रामस्थांना महिला व शाळेतील विद्यार्थ्यांना साडेतीन किलोमीटरचे जास्त अंतर जावे लागत होते यासाठी पोतेवाडीकरांनी अनेक आंदोलने केली पाणंद रस्ता असो की राजस्व अभियान रस्ता असो सर्व कायदेशीर निकाल तहसीलदार यांनी पोतेवाडी ग्रामपंचायतच्या बाजूने दिले परंतु येथील शेतकरी सराफ बंधू हे गट नंबर 39 मध्ये गट नंबर 58 च्या बांधाला लागून गट नंबर 39 च्या बांधाच्या दहा फूट आत स्वतः साठी वापर करून अडथळा निर्माण करत होते
याबाबत कै. धोंडीबा लिंबाजी पोते संजय राजेंद्र पोते, रामदास उर्फ छगन धोंडीबा पोते यांच्या अर्जावरून तहसीलदार यांनी मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 कलम 5(2)अन्वये विषय निकाली काढला होता परंतु तरीही हे शेतकरी हा रस्ता पोतेवाडी ग्रामस्थांसाठी अडथळा निर्माण करून रस्ता तयार करून देत नव्हते. येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी तालुक्यातील सर्व पक्षांच्या नेत्या ंबरोबर रस्त्याच्या कामात लक्ष घालण्याची विनंती केली होती परंतु कोणत्याही पुढाऱ्यांनी त्यांच्या कामात लक्ष घातले नाही प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासन दिले जात होते, परंतु गेली अनेक वर्षापासून रस्त्याचा प्रश्न जैसे थेच बनला होता.
पोतेवाडी ग्रामस्थांना जाणे येण्यास दररोज सात किलोमीटरचा अंतर जास्तीचे पार करावे लागत होते. रस्त्यासाठी सर्वत्र प्रयत्न करून हात टेकल्यानंतर पोतेवाडीचे विद्यमान सरपंच प्रवीण पोते यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांना ही सर्व हकीकत सांगितली असता, निलेश भाऊंनी तात्काळ रस्त्याला अडथळा निर्माण करणारे स्थानिक शेतकरी सराफ बंधू व ग्रामस्थांबरोबर चर्चा करून आपण या रस्त्याला अडचण करू नका अशी विनंती केली होती व त्यांनी ती लगेच मान्य केली व निलेश भाऊंनी स्वतः खर्च करून रस्ता तयार केला व तेरा वर्षानंतर पोतेवाडी ग्रामस्थांसाठी हा रस्ता खुला केला या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात निलेश भाऊंना यश आल्याने उत्साही पोतेवाडी ग्रामस्थांनी निलेश भाऊंना बैलगाडीवर बसवून डीजे साऊंड सिस्टिम, भजन म्हणत 20 बैलगाड्या व 27 ट्रॅक्टर असा ताफा घेऊन एक हजार ग्रामस्थांनी जल्लोष केला व महिलांनी भाऊंचे औक्षण केले व त्यांच्याच हाताने फित कापून रखडलेल्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
नंतर पोतेवाडी गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व सर्व ग्रामस्थांना यावेळी स्नेहभोजन देण्यात आले. नंतर गावकऱ्यांनी निलेश भाऊ गायवळ यांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त केले व सर्व ग्रामस्थांनी यावेळी आनंद व्यक्त केला.