जामखेड प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांच्या कल्याणासह सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी भरीव काम केले आहे. या पुर्वीच्या पंतप्रधानापेक्षा हे नक्कीच सरस काम आहे. तसेच मी सुद्धा विधानपरिषदेचा आमदार झाल्यानंतर एक वर्षांच्या काळात विविध विकासकामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तसेच यामुळे मतदारसंघात भाजपासाठी चांगले वातावरण निर्माण होत असून कर्जत व जामखेड बाजार समित्यांसह अनेक ग्रामपंचायतीं भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. असे प्रतिपादन करण्याबरोबर कार्यकर्त्यांनी केंद्रसरकारच्या योजनांची माहिती घराघरात पोहचवावी असेही आवाहन आ. राम शिंदे यांनी केले.
आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांनी गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या. त्याचा फायदा जनतेला होत आहे,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नऊ वर्ष यशस्वी पुर्ण केली या निमित्ताने महाजनसंपर्क अभियानांतर्गत काल दि. १८ जून रोजी प्रा. राम शिंदे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, पांडुरंग उबाळे, सलीम बागवान, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, बाजार समीती संचालक संचालक सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, ॲड. प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अर्जुन म्हेत्रे,ऋषिकेश मोरे , उद्धव हुलगंडे , तुषार बोथरा यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

गोरगरीब जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबवत यशस्वी केल्या

पीएम किसान सन्मान निधी योजना

२०१४ मध्ये मोदी यांनी पहिल्यांदा केंद्राची सूत्र हाती घेतल्यानंतर २४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी शेतकऱ्यांना आकर्षित करणारी अशी पीएम किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. शेतकर्‍यांना फायदा होणे हा या योजनेचा उद्देश. या योजनेनुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६.००० रुपये जमा करण्यात येते. दोन दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

मोदी सरकारने आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते दिले आहेत. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच घेता येतो. डिसेंबर ते मार्च 22 दरम्यान सरकारने 11 कोटी 11 लाख 96,895 लोकांना पैसे दिले. मात्र, या योजनेतही अनेकांनी आपले हात धुवून घेतले. त्यामुळे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जन धन योजना

15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला. देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याची मोहिम त्यांनी सुरु केली. हीच ती जन धन योजना. मोदी यांची ही योजना पूर्णतः यशस्वी ठरली. 2022 मध्ये जन धन योजना अंतर्गत देशात 45 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली. हा आकडा आता 48.99 कोटी इतका झाला.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

मोदी सरकारच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनांपैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन या योजनेअंतर्गत दिले जाते. 1 मे रोजी 2016 मध्ये ही योजना सुरू केली. सुरवातीला 1.5 कोटी कनेक्शन देण्याची योजना होती. पण, या योजनेचा प्रतिसाद इतका उदंड की ती संख्या 2.2 कोटी इतकी पोहोचली. वंचित कुटुंबांना 8 कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट मार्च 2020 पर्यंत ठेवण्यात आले होते पण प्रत्यक्षात ते 7 सप्टेंबर 2019 रोजीच पूर्ण झाले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना

26 मार्च 2020 रोजी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये ही योजना सुरु करण्यात आली. कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थितीत गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांना मोफत रेशन देण्याची ही योजना होती. सुरुवातीला एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना पुढे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली. सुमारे 80 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेसाठी मोदी सरकारने सुमारे ५.९१ लाख कोटी रुपये खर्च केले.

आयुष्मान भारत योजना

2018 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातून आयुष्मान भारत योजनेची घोषणा करण्यात आली. एक लाख आरोग्य केंद्रे उभारून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वार्षिक 5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षणासह जोडणे अशी ही योजना. 10 कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हर घर जल योजना

2020 – 21 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने हर घर जल योजनेची घोषणा केली. देशातील सर्व घरांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याची ही योजना. 2024 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची हि योजना आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही.

चौकट
आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदारकीच्या एका वर्षात दोनशे कोटी रुपये आणले आहेत यामुळे रस्ते, वीज पाणी या अनेक ठिकाणी असणाऱ्या समस्या सुटल्या तसेच जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी अडीचशे कोटी रुपयांची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच टेंडर प्रकिया सुरू होईल.

चौकट
विरोधकांना पराभव पचवता येत नाही माझा पराभव झाला व आमदार रोहित पवार विजयी झाले त्यावेळी मी माझ्या घरी बोलावून त्यांचा सत्कार केला पण मी आमदार झाल्यावर आमदार रोहित पवार यांनी साधे अभिनंदन देखील केले नाही. त्यांना सलग तीन पराभवाचे धक्के बसले म्हणून ते मतदारसंघात दडपशाही वातावरण निर्माण करत आहेत.

* प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत रेशन वाटप

* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली
• ११. ८ कोटी घरांपर्यंत पोहोचले नळाचे पाणी आणि 100% घरांमध्ये वीज पोहोचली
* ४८.३ कोटी जन धन खाती उघडून गरिबांना बँकिग प्रणालीमध्ये समावून घेतले

सशक्त शेतकरी, समृद्ध भारत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६.००० रुपयांची आर्थिक मदत

• प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत स्थापना ३७.५ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

• MSP मध्ये ऐतिहासिक वाढ (खर्चापेक्षा ५० टक्के अधिक MSP) आणि २०१३-१४ ते २०२२-२३ पर्यंत कृषी बजेटमध्ये ५.६ पट वाढ

• किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ४.७ लाख कोटी रुपये चे कर्ज

• प्रधानमंत्री कृषी सिचाई योजनेंतर्गत ५७ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला

आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण सुनिश्चित केले गेले.

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत ३४ लाख पथारी विक्रेत्यांना कर्ज वाटप

भारतातील अमृत पिढी

सक्षम बनते

१३९० नवीन विद्यापीठे, ७ नवीन IIT आणि ७ नवीन IIM ची स्थापना

• १५ AllMS आणि २२५ वैद्यकीय महाविद्यालयांची

• प्रधानमंत्री श्री योजनेंतर्गत १४.५०० शाळांचा विकास

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत १.३७ कोटी युवक प्रशिक्षित

• देशात लाख स्टार्टअप्स आणि १००+ यूनिकॉर्न

रोजगार मेळावे अंतर्गत ७१.००० हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण

नाटी तू नारायणी : महिला सक्षमीकरण

निरोगी जीवन प्रत्येकाचा हक्क

* भारतात प्रथमच प्रत्येक १.००० पुरुषांमागे १.०२० महिला

● प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ९.६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ११.७२ कोटी शौचालये बांधणे
स्टैंड अप इंडियाच्या लाभाथ्यपैिकी ८१ टक्के महिला आहेत

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत २७.६ कोटी महिला लाभार्थ्यांना मिळाले कर्ज

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत

३.०३ कोटी महिलांना मदत

* २६ आठवडे मशुल्क प्रसूती रजा मध्यमवर्गीय जीवन सोपे झाले

७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत

* मेट्रो सुविधा २० शहरांमध्ये पोहोचली

UDAN योजनेमुळे १.१६ कोटी लोकांना स्वस्त हवाई प्रवासाचा लाभ घेता आला आहे

१००+ स्मार्ट शहरांमध्ये ७८०० प्रकल्पांची अंमलबजावणी

• एप्रिल 2022 मध्ये GST अंतर्गत आतापर्यंतचे सर्वाधिक 21.87 लाख कोटींचे मासिक कर संकलन

आयुष्मान भारत अंतर्गत 10.7 कोटी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण आणि

4.5 कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले * 9,300 हून अधिक जन औषधी केंद्रांवर

स्वस्त औषधे उपलब्ध आहेत • वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या

बळकटीकरणासाठी 264,180 कोटींची तरतूद

1.59 लाखांहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत 220 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले

मिशन इंद्रधनुष अंतर्गत 5.65 कोटींहून अधिक माता आणि बालकांना लस संरक्षण मिळाले आहे

सक्षम भारत

आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी आणि 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे

‘कोरोनाच्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत 2.97 कोटी भारतीयांचे परत येणे सुनिश्चित केले आणि युक्रेन आणि येमेनमधून 27,000 हून अधिक भारतीयांची सुटकाही करण्यात आली

• भारताची सुरक्षा मजबूत झाली, 2014 पासून कोणत्याही मोठ्या शहरात (संघर्ष क्षेत्र वगळता) एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही

* कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली आहे.

“वसुधैव कुटुंबकम” या थीमवर भारताने G-20 शिखर परिषदेचे 2023 चे अध्यक्षपद स्वीकारले

* डिजिटल व्यवहारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९

पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास
*पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनची स्थापना
* 2014 पासून वाहतूक आणि महामार्ग बजेटमध्ये 500% वाढ
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा वेग 208% वाढून दररोज 12 किमीवरून 37 किमी प्रतिदिन झाला आहे.
* जागतिक दर्जाची वंदे भारत ट्रेन सुरू झाली आगामी काळात एकूण 400 बांधण्यात येतील
*विमानतळांची संख्या दुप्पट 74 वरून 148 वर
ईशान्येकडील राज्यांचा ऐतिहासिक विकास
*आसाममधील सर्वात लांब बोगीबील पुलाचे बांधकाम आणि सुबनसिटी लोअर येथे 2,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प
*आदिवासी आसाम शांतता करार आणि बोडो नागा, कार्बी शांतता कराराने ईशान्येत शांतता प्रस्थापित केली
*ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिरेकी घटनांमध्ये 76% घट

सांस्कृतिक वारसाचे नवीन युग

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर आणि काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम

सोमनाथ आणि केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार

• आदिवासी स्वाभिमान दिन आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित 10 आदिवासी संग्रहालये

• सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध
अशा अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी आणल्या आहेत.

आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदचे आमदार झाल्यानंतर मंजूर केलेली कामे

*मुख्यमंत्री सडक योजना रिसर्च अँड डेव्हलपमेंट टप्पा क्रमांक दोन 20 किलोमीटरच्या अकरा रस्त्यांसाठी 15 कोटी रुपये
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन 20 किलोमीटरच्या 18 कोटी 73 अक्षर रुपये
* मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन 13 किलोमीटरच्या चार रस्त्यांसाठी बारा कोटी चाळीस लाख रुपये
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन 21 किलोमीटरच्या चार रस्त्यांसाठी वीस कोटी रुपये *महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प मुख्य लेखाशीर्ष अंतर्गत रस्त्यांसाठी 26 कोटी रुपये
*महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प मुख्यालय का शिष्य अंतर्गत 23 किलोमीटरच्या नऊ रस्त्यांसाठी 24 कोटी रुपये
*तांडा वस्ती विकास योजनेच्या विविध कामांची 25 गावांसाठी पाच कोटी रुपये
*भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत 16 गावांमध्ये सामाजिक भावनांसाठी चार कोटी रुपये
*स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांनी साठी 28 गावांना दोन कोटी 14 लाख रुपये स्थानिक विकास सिंगल फेज थ्री फेज साठी 26 गावांसाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये *स्थानिक विकास निधीतून 73 डिजिटल शाळेसाठी प्रोजेक्टर करिता एक कोटी रुपये विविध पर्यटन विभागामार्फत विविध कामांसाठी पाच कोटी रुपये
* 25 15 योजनेअंतर्गत 25 गावांसाठी पाच कोटी रुपये नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी *लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नावाने शहरात पाच कोटी रुपयांच्या सभागृहासाठी तरतूद
* जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्व प्रकारचे कामांना मिळून 250 कोटींची मंजुरी हे काम टेंडर प्रक्रियेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *