जामखेड प्रतिनिधी
शिवारायांमुळे साधूसंतांचे भगवे वस्त्र, मंदिर, मंदिरांचे कळस व धर्म अबाधित राहीला – स्वामी महादेवानंद भारती महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि साधूसंतांचे नाते शब्दात न मावणारे व शब्दांच्या पलीकडचे आहे. त्यांच्यावरील माझी श्रध्दा मी शब्दात सांगू शकत नाही. शिवारायांमुळे साधूसंतांच्या अंगावरील भगवे वस्त्र, देव, मंदिर, मंदिरांचे कळस व धर्म अबाधित राहीला. आम्ही पंढरपूरात मठ बांधण्याबरोबरच छ. शिवरायांचे मंदिरही बांधला आहे. असे प्रतिपादन श्रीक्षेत्र अश्वत्थलिंग महादेव मंदिर (पिंपळवंडी ता. पाटोदा) येथील महंत स्वामी महादेवानंद भारती महाराज यांनी केले.
भगवान चंद्रशेखर चंद्रमौली परमात्मा श्री अश्वत्थलिंग महादेव मंदिर व श्री श्री १००८ श्री स्वामी गंगभारती महाराज संस्थान मठ पिंपळवंडी ता. पाटोदा, जि. बीड येथून श्री स्वामी महंत प.पू. गुरुवर्य महादेवानंद भारती गुरू संतोष भारती महाराज यांच्या मार्गदर्शना खाली आषाढी वारी निमित्त अश्वत्थलिंग महादेव मंदिर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पायी दिंडीचे जामखेड येथे अजय काशिद व काशिद परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
जामखेड शहरालगत असलेल्या साकत फाटा येथील चेअरमन मंगल कार्यालय परिसरात झालेल्या या दिडीं स्वागत सोहळ्याचे यजमान भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, सारोळा गावच्या सरपंच रितुताई काशिद, शहराध्यक्ष धनवडे, तहसिलदार योगेश चंद्रे, प्रविण चोरडिया, डाॅ. अल्ताफ शेख, उपसरपंच आप्पासाहेब ढगे, लहु शिंदे, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डाॅ. भरत दारकुंडे, परमानंद महाराज, प्रेमानंद महाराज, शिवानंद महाराज, सुवर्णानंद महाराज, मिनाबाई मडके महाराज, नारायण महाराज, ऋषी महाराज, आळंदीकर महाराज मंडळींसह
ज्ञानेश्वर कोळेकर, सोमनाथ राळेभात, किरण मुळे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे, उदयसिंग पवार, तात्याराव पोकळे, संजय राऊत आदिंसह दिडीं बरोबर असलेले परमानंद महाराज, प्रेमानंद महाराज, शिवानंद महाराज, सुवर्णानंद महाराज, मिनाबाई मडके महाराज, नारायण महाराज, ऋषी महाराज, आळंदीकर महाराज मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व २००० च्या वर वारकरी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिंडी सोहळ्याचे यजमान अजय काशिद म्हणाले की, स्वामी महादेवानंद भारती महाराज व आमच्या परिवाराचे ऋणानुबंध खूप जूने आहेत. आमचे कुटुंबाचे प्रमुख स्व. विष्णू वस्ताद काशीद हे महाराजांना गुरू व मोठ्या बंधू समान मानत होते. आमच्या परिवाराचे सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम महादेवानंद भारती महाराज यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखालीच होतात. त्यांच्या दिंडीची सेवा करावयास भेटने आमचे भाग्य भाग्य आहे.
दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान साकत फाटा येथे आलेल्या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या नंतर स्वामी महादेवानंद भारती महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
तसेच काशिद परिवार व मान्यवरांच्या हस्ते महाराज व त्यांच्या सोबतच्या महाराजांचे सत्कार करण्यात आले. यानंतर सर्व वारकऱ्यांना भोजन देण्यात आले. हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले.