श्री नागेश विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

 

२३०० विद्यार्थ्यांनी केले सामूहिक योगासन

आज दि. २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात नागेश विद्यालय, कन्या विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या २३०० विद्यार्थ्यी तसेच शिक्षक, एनसीसी कॅडेट व पालक यांच्या उपस्थितीत सामूहिक योगासने करत मोठ्या उत्साहात योगदान साजरा करण्यात आला.

यावेळी १७ महाराष्ट्र बटालियन अहमदनगरचे श्री नागेश विद्यालय युनिटने या योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी विविध व्यायाम व कवायत प्रकार घेऊन तसेच एनसीसी कॅडेट यांनी सूर्य नमस्कार, योगासने प्रात्यक्षिक सादर केले. संतोष सरसमकर यांनी विविध योगासन व मनोरे यांचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती सांगितली. शंभूलाल बडे यांनी कृतीयुक्त गाण्यातून व्यायाम प्रकार घेतले.


यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी. के. , मुख्याध्यापिका चौधरी के. डी., पर्यवेक्षक कोकाटे व्ही. के., पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, ज्युनियर कॉलेज विभागचे प्राह विनोद सासवडकर, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, संतोष सरसमकर आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी प्राचार्य मडके बीके यांनी विद्यार्थ्यांना योग व व्यायामाचे महत्त्व सांगून दररोज विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा व आपली शारीरिक क्षमता वाढवून चांगले कार्य व नियमित अभ्यास करावा असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी केले.
सतरा महाराष्ट्र बटालियनची कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष ॲडम ऑफिसर रणदीप सिंग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page