खर्डा:

जामखेड तालुक्यातील नायगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या पंचक्रोशी महाविद्यालयात आर्ट ऑफ लिविंग च्या सहयोगाने जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंचकृषी महाविद्यालयात आर्ट ऑफ लिविंग चे संतोष थोरात यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम, ध्यान आधी विविध योगासनाचे प्रकारांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन योग शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या व्यक्ती विकास सह विद्यार्थ्यांच्या नेतृत्व कला गुणांची उजळणी घेण्यात आली. विविध योगासनासह मैदानी खेळ, आहार ,व्यसनमुक्ती पर्यावरण संरक्षण , आरोग्य सह विविध सामाजिक विषयावर संतोष थोरात यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव साळवे, उपप्राचार्य सचिन टेकाळे, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक हनुमंत कोरे, प्रा कालिदास घोडके ,प्रा सचिन बोंडगे, प्रा अशोक बोराटे, प्राध्यापिका आशा शेकडे ,प्रा निलेश फुंदे ,प्रा हनुमंत नागरे यांच्यासह नायगाव येथील ग्रामस्थ योग दिन विद्यार्थ्यांसह उपस्थित राहून सर्वांनी योगाचे धडे घेतले. यावेळी उपस्थितांचे सूत्रसंचालन व आभार प्रा. हनुमंत कोरे यांनी व्यक्त केले.


यास योग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ ,केंद्रीय प्राथमिक शाळा मुले मुली, श्री प्रगती महाविद्यालय, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय ,रयत शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा यासह विविध शाळा महाविद्यालय सह मॉर्निंग क्रिकेट क्लब कानिफनाथ मैदान येथेही योग दिनानिमित्त युवक,विद्यार्थी ,पोलीस प्रशासन यांच्यासह ग्रामस्थांनी योग दिन साजरा करून योगाचे धडे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *