*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र , अंतर्गत उज्वलयोग स्किल ट्रेनिंग सेंटर , खर्डा. उद्घाटन सोहळा संपन्न. . . .*
जामखेड प्रतिनिधी,
.दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 गुरुवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागयांच्या मार्फत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा संपन्न झाला महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांमध्ये 511 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोजगार क्षम विषयांचे व्यवसायाचे प्रशिक्षण काळाची गरज आहे व भारत हा देश समस्त जगाला कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सक्षम आहे अशी ओळख आपल्या देशाची झाली पाहिजेयासाठीच ही प्रशिक्षण केंद्र सगळीकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत
या प्रशिक्षण केंद्राचा सर्व युवकांनी लाभ घेऊन स्वतःला रोजगार क्षम बनवावेअसे आवाहन माननीय पंतप्रधानांनी केले या ऑनलाइन कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय श्री अजितजी पवार कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री मंगल प्रभात जी लोढा हे देखील ऑनलाईन उपस्थित होते तालुका -जामखेड . खर्डा येथील उज्वल योग स्किल ट्रेनिंग सेंटर या संस्थेचा उद्घाटन सोहळा रत्न सुरेश मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
या उद्घाटन कार्यक्रमासश्री रवि दादा सुरवसे ( जिल्हा उपाध्यक्ष भाजपा) श्री वैजनाथ पोपटराव पाटील (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक )श्री गणेश लटके सरपंच – सातेफळ श्री महेश दिंडोरे ग्रामपंचायत सदस्य , खर्डा, श्री राजू मोरे ग्रामपंचायत सदस्य ,खर्डा श्री संजय आबा गोपाळघरे माननीय सरपंच खर्डा श्री प्रशांत सातपुते ग्रामसेवक श्री गोलेकर पाटील उपप्राचार्य खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा श्री बारटक्के सर प्राचार्य श्री छत्रपती ज्युनिअर कॉलेज खर्डा श्री खिस्ते सर प्राचार्य श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा श्री एके वाघ प्राचार्य आयटीआय जामखेड श्री के डी गायकवाड गटनिर्देशक तथा कार्यक्रम समन्वयकश्रीआव्हाड सर श्री जायभाय सर श्री शेलार सर श्री देवगुडे सर श्री दगडे सर श्री तुमेदवार सर श्री सर श्री सानप सर श्री धाऊड सर श्री शिवाजी उगले श्री भोजने श्री अनिल वाघ प्रतिनिधी उज्वलयोग स्किल ट्रेनिंग सेंटर खर्डा
या कार्यक्रमास खर्डा परिसरातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ,महाविद्यालय बहुसंख्य विद्यार्थी, आयटीआय कॉलेज प्रशिक्षणार्थी व सर्व संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. .