आरंभ फाउंडेशनचे काम कौतुकास्पद – तहसीलदार योगेश चंद्रे
आरंभ फाउंडेशन मार्फत भाविकांना फराळ वाटप

जामखेड प्रतिनिधी दि

नव्या संकल्पना घेऊन उदयास येणारे आरंभ फाउंडेशनचे कार्य अतिशय चांगले असून या माध्यमातून समाजातील लोकांची सेवा करण्याच्या उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्य करत आहेत ही अतिशय चांगली आहे. निश्चितच समाजातील विविध घटकांना पुढे जाण्यास मदत होणार आहे.त्यामुळे आरंभ फाउंडेशन चे करावे तितके कौतुक थोडेच आहे असे प्रतिपादन तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.


श्री तुळजाभवानी मातेचे बुर्‍हानगर ते तुळजापूर पलंगाचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले यावेळी मेन रोड येथील चौकात आरंभ फाउंडेशन मार्फत येणाऱ्या भाविक भक्तांना १ हजार फराळ पाकिटे वाटप करण्याचा शुभारंभ तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक महेश पाटील,उद्योजक आकाश बाफना,कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले,मनसेचे सनी सदाफुले,

सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,पांडुरंग भोसले,भाजपचे शहराध्यक्ष अभिजित राळेभात,समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे,युवा उद्योजक सोहेल पठाण ऍड प्रमोद राऊत, आरंभ फाउंडेशनचे अमोल आंधळे,पत्रकार ओंकार दळवी,चेतन राळेभात,विशाल लोळगे,स्वप्नील बरबडे,संजय फुटाणे,उमेश बांगर,ऋषिकेश ओझर्डे,अक्षय ठाकरे,पत्रकार समीर शेख,अमर चाऊस,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,प्रवीण कराडकर,

भरत आटोळे,तानाजी पवार,शिवाजी भोसले,मीरा तंटक,अशोक हुलगुंडे,विनोद लोळगे,हितेश वीर,मयूर टेकाळे,अनिल पाटील,श्रीधर सिद्धेश्वर,वेदांत दळवी,अमोल फंदाडे,पांडुरंग कोल्हे,नाना कोल्हे, भुजंग दळवी,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *