पोलीस बॉईज असोसिएशन जामखेड तालुका कार्यकारणीची निवड ।।
पोलीस बॉईज असोसिएशनच्या जामखेड तालुका महिला आघाडी स्मिता विशाल गुलाटी जामखेड तालुकाध्यक्षपदी
श्री अरुण बाजीराव शिरसाट जामखेड तालुका उपाध्यक्षपदी आनंद कोळपकर कार्यकारणी पदी आदम शेख सुधीर साठे यांची निवड
जामखेड प्रतिनिधी,
रविवार दिनांक ११/०८/२०२४ रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रविभाऊ वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास भाऊ सुसर पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्री संजय (नाना) दराडे यांच्या आदेशाने यांची पोलीस बॉईज असोसिएशनचे नियुक्तीपत्र देऊन अधिकृत रित्या निवड करण्यात आली.
त्यावेळी स्मिता विशाल गुलाटी यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यास सुरुवात करण्यास सांगितले ही संघटना पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये ५℅ टक्के आरक्षण मिळवून दिले आहे व ५०सेकंड रनिंग मध्ये मिळवून दिले आहे यासारखे अनेक सामाजिक राजकीय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व त्यांच्या कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत आहे व सामान्य जनतेच्या हक्कासाठी समर्पित भावाने काम करेल असे अस्वस्थ केले तसेच स्मिता गुलाटी अरुण शिरसाट यांची निवड करण्यात आली.
त्यावेळेस उपस्थित असलेले श्री संजय (नाना) दराडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अँड सल्लागार मेघराज नालंदे अँड सल्लागार ओंकार इंगुले पत्रकार माधव झगडे शहराध्यक्ष शितल शहा कोषाध्यक्ष विनीत किर्वे श्री संजय (अण्णा) शिंदे महिला शहराध्यक्ष हिना कौशीर अत्तार उपाध्यक्ष नंदिनी गुंदेचा कल्याण मोहिते आदी उपस्थित होते.