जामखेड प्रतिनिधी
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव आळवा दि. १३ जून रोजी रात्री १ : ३० वाजता १५ वर्षीय अल्पवयीन मुलीबाबत गंभीर प्रकार घडला आहे. सदर पिडीता तिच्या घरासमोर झोपलेली असताना आरोपीने तेथे येऊन व तीस झोपेतून उठवून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन व लग्नाचे अमिष दाखवून पिडीतेस घेऊन गेला आहे. यानुसार आरोपी ऋतुराज भारत बारवकर (वय २०) याचे विरुध्द विनयभंग, पोस्कोसह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्याची गांभीर दखल घेत गुन्हा दाखल झाल्यानंतर खर्डा पोलीसांनी आवघ्या एका तासात आरोपीस अटक करण्याची कामगिरी केली आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव आळवा येथील १५ वर्षे ४ महिने वयाची अल्पवयीन पिडिता ही दहावी बोर्डाची परीक्षेसाठी जात असताना त्याच गावातील आरोपी ऋतुराज भारत बारवकर (वय २०) याने फिर्यादी पिडीतेचा पाठलाग करून दि. १३ जून रोजी रात्री १ : ३० वाजताचे पिडीता तिच्या घरासमोर झोपलेली असताना आरोपीने तेथे येऊन व तीस झोपेतून उठवून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन व लग्नाचे अमिष दाखवून पिडीतेस घेऊन गेला आहे. यानुसार फिर्यादी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 354(ड ),363,366(अ ),506 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 11,12 प्रमाणे ऋतुराज भारत बारवकर वय 20 वर्ष रा.पिंपळगाव आळवा याचे विरुध्द विनयभंग व पोस्को सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून आहे. गुन्हा दाखल होताच खर्डा पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीस आवघ्या एका तासात अटक करण्याची कामगिरी केली आहे. तसेच गुन्हात वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH16 D.D 4909 ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
सदर अटकेची कारवाई करण्यात खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशी म्हस्के, बाळू खाडे, दीपक बारवकर यांचा समावेश होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.