निवडणूकीत शाब्दिक वार प्रतिवार,आणी निकालानंतर थेट हल्ले,मारहाण..

जामखेड प्रतिनिधी

खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे आज गुरुवारी दुपारी एक वाजता हल्ला करण्यात आला. झावरे हे पारनेर बसस्थानकाजवळ मोटारीत असतानाच वाहनांच्या काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात येणार आहे. हल्ला झालेले निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर नगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला आहे
त्यामुळे निवडणुकीपुर्वी प्रचारा दरम्यान शाब्दिक हाल्ले प्रतिहाल्ले सुरू होते अरोप प्रतिआरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या मतदान झाले आणि निकाल लागल्यानंतर वातावरण निवळले जाते व विजयी उमेदवार पराजित उमेदवार यांचे समर्थक सर्व वैर सोडुन पुन्हा कामाला सुरवात करत आसतात ही जिल्ह्याची परंपरा आहे मात्र आता तसे होताना दिसत नाही याचाच एक भाग म्हणजे आज झालेला हल्ला.

 

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला. आता खासदार निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांच्या या विजयाला अवघे दोन दिवसही उलटत नाहीत तोच त्यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला आहे.

 

पारनेर येथील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय १० ते १२ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड करून त्यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत

निलेश लंके हेही लवकरच राहुल यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या हल्ल्यामुळे गावातील वातावरण अतिशय तापलं असून तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र हे हल्लेखोर नेमके कोणे होते, राहुल यांच्यावर हा हल्ला का झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *