डॉ. सुजय विखेंचा पराभव तर निलेश लंकेचा विजय
या तालुक्यांनी केला विखे यांचा घात….

जामखेड प्रतिनिधी :-

अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. जनतेने दाखवून दिले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतली होती असेच म्हणता येईल. भाजपचा फुगा हा मतदानानंतर फुटला आहे. विशेष म्हणजे ज्या पट्ट्यात महायुतीला मतदानाची अपेक्षा होती त्याच पट्ट्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 


शेवगाव पाथर्डी मधून अपेक्षेप्रमाणे सुजय विखे यांना मतदान मिळाले आहे. एक लाख 63 हजार 992 तर निलेश लंके यांना शेवगाव पाथर्डीमध्ये 98 हजार 551 इतके मतदान मिळाले. राहुरी मतदार संघात डॉक्टर सुजय विखे यांना एक लाख 65 हजार 558 तर राहुरीला महाविकास आघाडीचे निलेश लंके यांना 94 हजार 686 इतके मतदान मिळवले आहे.

राहुरी व शेवगाव मध्ये नीलेश लंके मागे असले तरी त्यांना श्रीगोंदा मतदार संघाने व पारनेर मतदार संघाने भरभरून मतदान केले. सुजय विखे पाटील यांना श्रीगोंदा येथून 86249 इतके मतदान मिळाले तर नीलेश लंके यांना 118960 इतके मतदान मिळाले. या ठिकाणी जवळपास 32 हजार सातशे अकरा मतांचा फरक आहे.

त्याचप्रमाणे पारनेर मतदारसंघात सुजय विखे यांना 92340 तर निलेश लंके यांना 1304 40 इतके मत मिळाली. सुद्धा जवळपास 38100 इतका मोठा फरक असून याचप्रमाणे कर्जत जामखेडने सुजय विखे यांना 95516 तर निलेश लंके यांना 104684 इतके मतदान दिले. त्यामुळे येथे सुमारे 9168 इतक्या मतांचा फरक मिळाला यामुळे नीलेश लंके यांनी मुसंडी मारली होती.

खासदार सुजय विखे हे अहमदनगर शहरात मोठ्या फरकाने पुढे होते अहमदनगर शहरात सुजय विखे यांना 105849 तर नीलेश लंके यांना 74263 इतके मताधिक्य मिळाले. या ठिकाणी सुजय विखे हे 31 हजार 586 इतक्या मताने आघाडीवर होते.

तर पोस्टर मतदानातही निलेश लंके यांना सुजय विखे यांच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले निलेश लंके यांना 2653 तर सुजय विखे पाटील यांना 2300 मतदान मिळाले या मध्ये 353 मतांनी या ठिकाणी सुद्धा निलेश लंके आघाडीवर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *