आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या भूमीपूजन सोहळ्यासाठी तसेच युवा संघर्ष यात्रेच्या शुभारंभासाठी दि. 16 नोव्हेंबर वार गुरूवारी दुपारी चार वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आजबे यांनी केले आहे.
जामखेड प्रतिनिधी,
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी 2 कोटी तीन लाख व सीना नदीवरील पश्चिम घाट बांधकामासाठी 4 कोटी 99 लाख निधी मंजूर करण्यात आला होता व आता संग्रहालय बांधकामासाठी तीन कोटी रुपये, नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभिकरण 2.5 कोटी रुपये व दोन भव्य मोठ्या कमानी बांधकाम 1.5 कोटी रुपये असा सात कोटी रुपये असे एकूण 14 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौंडी येथे संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आजबे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौंडी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन सोहळा व युवा संघर्ष यात्रा शुभारंभ गुरूवार दि. १६ रोजी चार वाजता संपन्न होत आहे तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून भुषणसिंग होळकर अहिल्यादेवी होळकर यांचे इंदोरचे वंशज, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार विश्वजित कदम काँग्रेस, सुषमा अंधारे उपनेत्या शिवसेना यांच्या उपस्थितीत सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन सोहळा १६ नोव्हेंबर रोजी चार वाजता शासकीय विश्रामगृह शेजारी मैदान चौंडी येथे संपन्न होत आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना रमेश आजबे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी 14 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणला आहे. नदीवरील एक घाट व जिल्हा परिषद शाळा बांधकाम झाले आहे. आता सात कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन होत आहे. राज्यातील घटक पक्षाच्या मुलुख मैदानी तोफा चौंडीत येत आहेत.
तसेच आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा चौंडीतून कार्यक्रमानंतर लगेच सुरू होत आहे. पहिला मुक्काम हळगाव व दुसरा मुक्काम जामखेड येथे शिवनेरी अकॅडमी येथे होत आहे. विविध प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा आहे तेव्हा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आजबे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी होत असलेल्या विविध विकास कामांच्या भुमिपुजन व युवा संघर्ष यात्रेच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.आमदार रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी दोन कोटी तीन लाख रुपये, सीना नदी पश्चिम घाट बांधकाम करण्यासाठी 4 कोटी 99 लाख रुपयांची अशी कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणली आहेत.कार्यक्रम ठिकाण शासकीय विश्रामगृह शेजारी मैदान चौंडीउद्घाटन व यात्रेसाठी सर्व युवक व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने यावे