जामखेड पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने महिला चोरट्याला बेड्या

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड बस स्थानक ते नाशिक जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरी करून लंपास होणाऱ्या महिलेला जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत 17,700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे

अटक केलेल्या महिलेचे नाव अर्चना अजय भोसले वय 23 वर्षे, रा. वाकी ता. आष्टी जि.बीड असे आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी सण चालु असुन जामखेड बसस्टॅण्डवर जास्त प्रमाणात प्रवाशांची गर्दी असुन गर्दीच्या ठिकाणी दागीने, पाकीट मार मोठ्याप्रमाणात होत असतात त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड पोलीस स्टेशन यांनी कर्मचारी यांना योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन करुन सक्त पेट्रोलिंग बंदोबस्त सुरु असताना चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना बस स्टॅण्डवर पेट्रोलिंग करत असलेले कर्मचारी पोकों, प्रकाश मांडगे, पोकों देविदास पळसे


यांनी एक महीला जामखेड बस स्टॅण्डवर संशयित रित्या फिरत असून लोकांचे बँगा चाचपडत असल्याचे दिसले सदरची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सांगितली त्यांच्या तात्काळ आदेशानुसार
पोहेकॉ.प्रविण इंगळे, पोना संतोष कोपनर व मपोकों दहीरे यांना सांगुन बसस्टॅण्डवर जावुन महीलेस विचारपूस करण्यास सुरवात केली सुरवातीला महिलेने उडवा उडवीचे उत्तरे दिली तिची कसून चौकशी केली असता पोलिसी खाक्या दाखविताच महिलेने चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे साहेब, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे, पोना संतोष कोपनर, पोना जितेंद्र सरोदे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकों देविदास पळसे, पोकों कुलदिप घोळवे, मपोकों दहीरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *