आयुर्वेदिक उपचार पद्धती ही प्रभावी व गुणकारी-डॉ. सौ.वर्षा भा.मोरे पाटील
*रत्नदीप शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा*
जामखेड प्रतिनिधी,
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने धन्वंतरी प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले. यावेळी जामखेड तालुक्यातील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टरांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील, सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित मोरे पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सर्फराज खान, डॉ.प्रताप गायकवाड, डॉ.भैय्या खैरनार, डॉ.फारुख आजम, डॉ.राजेंद्र पवार, डॉ. सुनिल कटारीया, डॉ.सौ.विद्या काशिद, डॉ.सौ.रेखा पवार, डॉ.सिताराम ससाणे, डॉ.नितीन मडावी, डॉ. सुशिल पन्हाळकर डॉ.संदीप सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील म्हणाल्या की आयुर्वेद ही आपली प्राचीन औषध उपचार पद्धती असुन ती प्रभावी व गुणकारी उपचार पद्धती आहे. यावेळी डॉ. सौ.वर्षा मोरे पाटील यांच्यासह संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समित मोरे पाटील, डॉ. प्रताप गायकवाड,डॉ. राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सर्फराज खान यांनी केले व आभार प्रा. डॉ. नितीन मडावी यांनी मानले.
यावेळी बोलताना डॉ. प्रतापराव गायकवाड म्हणाले की,रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.
यावेळी डॉ. राजेंद्र पवार बोलताना म्हणाले रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय आयुर्वेद दिवसा निमित्त जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ व नामांकित आयुर्वेदाचार्य यांचा सन्मान केल्याबद्दल संस्था अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांना धन्यवाद व आगामी संकल्पपुर्तीसाठी शुभेछा