रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे 6 लँब करण्यात आले
सील…..
विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होऊन देणार नाही – डॉ. संदीप पालवे !
जामखेड प्रतिनिधी-
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या अंदोलनाच्या चौथ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन सदस्यीय सत्यशोधन समितीने शुक्रवारी सायंकाळी रत्नदीप शैक्षणिक संकुलातील 6 लॅब सील करण्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली. रत्नदीपचे संस्थापक डॉ.भास्कर मोरे यांच्यावर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळवणूकीचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
मोरे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे चार दिवसांपासून अंदोलन सुरु आहे. आज चौथ्या
दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने जामखेडला भेट दिली. रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील अंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
त्यानंतर विद्यापीठ सत्यशोधन समितीचे सदस्य डॉ संदिप पालवे, जी वाय दामा, डॉ अमोल घोलप, तहसीलदार गणेश माळी, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी रत्नदीप शैक्षणिक संकुलास भेट दिली. या ठिकाणी या पथकाला अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या.
काही कागदपत्रांची मागणी केली ती कॉलेजने पथकाला दिले नाही. संस्थेच्या सचिव पथकाला भेटायला आल्या.
सुरुवातीला त्यांनी पथकाला सहकार्य केले नाही. परंतू काही वेळाने त्यांनी पथकाला सहकार्य केले.
त्यानंतर सत्यशोधन पथकाने संपुर्ण कॉलेजची
पाहणी केली. यावेळी या पथकाला लॅबमध्ये संशयास्पद गोष्टी सापडल्या. यामध्ये पुर्णपणे डेट झालेले मटेरियल आढळून आले. मेडिकल कॉलेजचे मटेरियल फार्मसी कॉलेजमध्ये आढळून आले.
अश्या अनेक धक्कादायक गोष्टी या पथकाच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर पथकाने पंचनामा करत सहा लॅब सील करण्याची मोठी कारवाई केली आहे. 6 लँब करण्यात आले सील….