जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर येथील अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचा सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय रूग्णमित्र पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना देण्यात आला.
अहमदनगर येथील हाॅटेल व्ही स्टार येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजीमंत्री आमदार प्रा राम शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते , इकबाल शेख, संतराम सूळ अमृत कोठारी , संकेत कोठारी , तेजस कोठारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आत्तापर्यंत साडेतीन हजार लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. तर ४७० लोकांचे मरणोत्तर देहदान संकल्प अभियाना मध्ये अर्ज भरून घेतले आहेत. त्यापैकी ११लोकांचे देहदान केले आहे.
कोरोना काळामध्ये गरजूंना किराणा वाटप केले. मुक्या प्राण्यांना भाकरी टाकतानाच ,जनावरांना हिरवा चारा देऊन त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली. कोरोना काळामध्ये बेवारस मृतांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक कार्याची दखल घेऊन अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.