सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या गावामध्ये अवैध धंदे होत असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला माहिती दयावी – पोलीस निरिक्षक महेश पाटील….
जामखेड प्रतिनिधी –
आज दि. 19/5 /2023 रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे सरपंच व उपसरपंच यांची बैठक घेण्यात आली या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काही सरपंचांना सुचना दिल्या ग्रामीण भागात शेत रस्त्यावर, शेत बांधावर भांडण होत असतात. किंवा काही
समाजकंटक गुन्हेगारी करतात गाव गुंड करतात अश्या व्यक्ती ची माहिती सरपंचांनी व उपसरपंचानी पोलीसांना दयावी.
तसेच लव जहाद, गोवंश हत्या, यात्रा उत्सव,
गावामध्ये भांडणे होऊ नये म्हणून लक्ष देण्याचे काम सरपंचांनी व काही गावातील जबाबदार व्यक्तींनी ठेवावी. सोशल मिडिया वर सरपंचांनी लक्ष दयावे ग्रामसुरक्षा योजना अंतर्गत सर्वाना फोन जोडावे. गुन्हेगारी ना मदत करायची नाही. सरपंच व उपसरपंच यांनी कायदे चे पालन करावे. गावा मध्ये जर अवैध धंदे होत असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला माहिती दयावी
तसेच चुका हे सर्वांन कडुन होत असतात पण चुका सुधारून घ्यावे यावेळी बोलताना महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंचांनी व उपसरपंच नी सुध्दा खोट्या तक्रारीरी दाखल कराव्याच्या नाहीत. जे सत्य आहे तेच सांगायचे आहे. असे अव्हान जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित सरपंच व उपसरपंच संतोष महादेव खैरे, हर्षद हिंदुराज मुळे, औदुंबर नाना शिंन्दे, श्री विश्वनाथ शंकर राऊत, श्री.सिताराम भिवा कांबळे, श्री युवराज गायकवाड, दिपक नेटके, नवनाथ श्रीधर जाधव,बाबासाहेब शंकर शिंदे, पांडुरंग दत्तात्रय गर्जे, कृष्णा खाडे, वामन आत्माराम डोंगरे, लहू अरुण शिंदे, अशोक गव्हाणे ,वाहेद पठाण यावेळी मोठय़ा संख्येने सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.