सुप्रिम कोर्टाने हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दि. ४ आॅगस्ट २०२२ रोजी कलम. 376 (N),506 गुन्हा दाखल झाला होता
जामखेड प्रतिनिधी
बीड- पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल दाखल गुन्ह्यात अटक पुर्व जामीनसाठी सुप्रिम कोर्टापर्यंत गेलेले मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांचा पुर्व जामीन सुप्रिम कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती हाती आली आहे. मोहरी ता जामखेड जि अहमदनगर येथील महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत सविस्तर असे की, बीड जिल्हा, पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांचे विरोधात जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका महिलेने फिर्याद दिली होती की, जून ते २०२२ ते दिनांक १२ /७ /२०२२ रोजी रात्री १२:०० च्या सुमारास फिर्यादी महिला यांना सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच संमतीशिवाय यातील बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून आरोपी बुवासाहेब खाडे विरोधात भा. द. वि. कलम. 376 (N),506 गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी सुप्रिम कोर्टापर्यंत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जंगजंग पछाडले मात्र त्यांना जामीन मिळू शकला नाही. सुप्रिम कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला असल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे.
जामीन फेटाळल्याने त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक करता येऊ शकते. मात्र महाराजांचे राज्यभरात मोठे भक्त असल्याने त्यांना अटक करताना खर्डा पोलीसांना मोठी खबरदारी घ्यावी लागली. खाडे महाराजांना अटक करण्याचे मोठे आव्हान खर्डा पोलीसांपुढे असणार आहे.
चौकट..
बुवासाहेब जिजाबा खाडे महाराज यांचे विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल असून त्यामध्ये ठेवण्यात आलेला जामीन अर्ज सुप्रिम कोर्टातही फेटाळला असून, त्यांच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यांचा अटकेसाठी खर्डा पोलीसांच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बुवासाहेब खाडे महाराजांना लवकरच अटक केली जाईल..
महेश जानकर, पोलीस निरीक्षक,
पोलीस स्टेशन खर्डा, ता. जामखेड.