*सौताडा घाटाच्या पायथ्याशी सिमेंटचा ट्रक पलटी होऊन एकजण जबर जखमी*

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली जखमीला मदत
जामखेड जवळून सौताडा घाटाच्या पायथ्याशी सिमेंटचा ट्रक पलटी होऊन एकजण जबर जखमी झाला घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले यावेळी गाडीतील ड्रायव्हर कृष्णा शिवराज कांगणे मुक्काम पोस्ट सावरी तालुका किनवर


जिल्हा नांदेड हा एम. एच. 34  बी. जी. 1735 अंबुजा सिमेंटने भरलेला ट्रक चंद्रपूर (अंबुजा) येथून कडा तालुका आष्टी जिल्हा बीड येथील राहुल पटवा यांना पोहच करण्यासाठी येत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला सुदैवाने ड्रायव्हरचा फक्त हात मोडलेला आहे घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळताच कोठारी यांनी आपले मित्र दीपक भोरे, सचिन गाडे ,सुनील मोरे, तुकाराम जाधव यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले जखमी अवस्थेत असलेला ड्रायव्हर कृष्णा कांगणे यास ताबडतोब दवाखान्यात दाखल केले असून त्याची तब्येत आता बरी आहे या कामी संतोष (मामा) लोढा, नितीन मेहेर,रमेश धोत्रे ,प्रभाकर काकडे यांनी मदत केली

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सदर माहिती दिली असून पाटील यांनी ताबडतोब घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल यांना पाठवले

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले या आठवड्यात पाच अपघात झाले चारी बाजूला रोड चे काम चालू असल्यामुळे या घटना घडतात तरी प्रशासनाने ताबडतोब रस्त्याचे काम करून घ्यावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *