Latest Post

Featured News

अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत
अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार
जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरीविश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थनाईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरीविश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थनाईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

Health

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल

*सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल*

जामखेड प्रतिनिधी,

हॉटेल सेलिब्रेशन नगर रोड समोर एका महिन्यात आठ जण जखमी

हॉटेल सेलिब्रेशन समोर रोडचे काम चालू आहे परंतु तेथे शंभर फूट रोड करण्याचा राहिला असल्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये गाड्या फास्ट आलेल्या जातात आणि त्यामधील लोक जखमी होतात याकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टरने आणि अधिकाऱ्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे सदर घडलेल्या अपघाताची माहिती संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनीयर सुरज पुरी यांना वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली आहे

सायंकाळी ८=०० वाजता सुधीर अंकुश कोल्हे वय ३८ राहणार जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांचा मोटरसायकल वर जात आसतांना रोडचा अंदाज न आल्याने रोडवर बऱ्याच ठिकाणी खटकी असल्यामुळे अपघात होऊन गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे आणि हात फॅक्चर झाला आहे

दुसरा अपघात तसेच आयशर टेम्पो साकत घाटामध्ये पलटी झाला असता नासिर इब्राहिम कुरेशी राहणार जामखेड तालुका जामखेड यांचा साकत घाटामध्ये अपघात झाला असून त्यास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णवाहिका पाठवून दवाखान्यात दाखल केले त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर दोन्ही घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ता संजय कोठारी यांना संतोष नवलाखा आणि अविनाश कदम यांनी दूरध्वनी द्वारे कळवले असता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ताबडतोब गाडी पाठवून जखमींना दवाखान्यात दाखल केले आहे सदर माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे इंगळे दादा घोळवे दादा करीत आहेत.

या अपघाता दरम्यान जखमींना समीर चंदन, दीपक शेळके, अमित पठाडे ,आदींनी मदत केली

अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत
अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार

Economy

food processing unit अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

food processing unit  सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे.  या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा  कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी  प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.

वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा  लाभ देण्यात येतो.

सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.

बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.

काय आहे योजनेचा उद्देश?

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न  प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.

कोठे संपर्क करावा

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.

कोणते अन्नप्रक्रिया उद्योग

दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,

लस्सी.

■ मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.

■ पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,

आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट

प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.

■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व

प्रकारची तेल उत्पादने.

■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,

ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.

■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य

इत्यादी.

■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे

इत्यादी.

■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.

■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

Latest News

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल

*सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल* जामखेड प्रतिनिधी, हॉटेल सेलिब्रेशन नगर रोड समोर एका महिन्यात आठ जण जखमी हॉटेल सेलिब्रेशन समोर रोडचे काम…

अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत

अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत जामखेड प्रतिनिधी – जामखेड – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘देवी अहिल्याबाई’ या हिंदी नाटकात अहिल्याबाईंची मध्यवर्ती भूमिका मूळची नगरची असलेली…

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना (अहिल्यानगर जामखेड): महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केली आहे. राज्यातील प्रत्येक गावांच्या तलावातील…

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार जामखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत साकत (ता. जामखेड) येथील वैभव बळीराम वराट याची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी…

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरीविश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थनाईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरीविश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थनाईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन जामखेड प्रतिनिधी जामखेड – जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, अरणगांव, जवळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान…