जामखेड – वन कर्मचारी ताहेर अली सय्यद सेवापूर्ती सोहळा संपन्न
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील वन विभागातील कर्मचारी ताहेर आली सय्यद, श्री.बापू जायभाय श्री.शंकर बाराते श्री काकडे,पवार मॅडम हे पाच कर्मचारी दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

दिनांक 5 जून 2025 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कर्जत येथे कार्यालय प्रमुख व वनपरिक्षेत्राधिकारी मोहन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. 5 जून 2025 पर्यावरण दिन असल्याने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मौजे भांडेवाडी येथील जैवविविधता उद्यान येथे विविध प्रकारचे झाडे लावून व उद्यानामध्ये साफसफाई करून वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी शेळके साहेब वनपाल कर्जत वनपाल जामखेड वनरक्षक वनमजूर बापूसाहेब जायभाय शंकर बाराते काकडे पवार मॅडम यांचा शाल सेफ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ताहेरली सय्यद यांनी बोलताना सांगितले की 40 वर्षाच्या अनुभवातून चांगले वाईट अनुभव आलेले आहेत ते अतिक्रमण असो किंवा वन्य प्राण्यांचे शिकार असो अथवा वन्यप्राणी जखमी झालेला असेल वेळोवेळी आपण प्रामाणिकपणे काम करीत राहिलो मी आत्ता नवीन कर्मचारी आलेले आहेत त्यांनी सुद्धा या कार्यरत असलेल्या जुन्या अनुभवी मजुराचे सहकार्य घेऊन व त्यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा घेऊन पुढील वाटचाल केल्यास निश्चित फायदा होईल व कुठेही काम करण्यास अडचण येणार नाही यावेळी वनपाल कर्जत सुरेश भोसले यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जामखेड वनपाल प्रदीप उबाळे वनरक्षक सपकाळ तेलंगे राठोड व मिरजगाव वनरक्षक मॅडम उपस्थित होते यावेळी वनमजूर संजय आडसूळ शरद सूर्यवंशी बबन महारनोर माळशिकारे शिवाजी चिलगर श्याम डोंगरे राघू सुरवसे नजर लोखंडे व सेवानिवृत्त वन कर्मचारी अंकुश गवळी उपस्थित होते. कार्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भोसले यांनी केले शेवटी वनपाल प्रदीप उबाळे यांनी आभार मानले.