उदयाचा जामखेड बंद मागे
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548D मार्गावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांनी पुकारलेला बेमुदत बंद स्थगित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री. चेमटे यांनी ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना व्हावी, या मागणीसाठी आमरण उपोषण व सर्व पक्षीय बंदची घोषणा करण्यात आली होती.
मात्र प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उद्याचा बंद स्थगित करण्यात आला असून तोपर्यंत सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरू राहणार आहे.निर्धारित मुदतीत हद्द निश्चित न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून सर्व व्यापारी, ग्रामस्थ आभार मानण्यात आले.
![]()