Home जामखेड वार्ता जामखेड येथे ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चा शुभारंभ

जामखेड येथे ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चा शुभारंभ

0
4

*सामान्यांच्या जीवनाला नवी दृष्टी देणार डॉ. मिसबाह शेख – श्रीकांत होशिंग*

जामखेड येथे ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चा शुभारंभ

जामखेड | प्रतिनिधी

दृष्टी स्पष्ट असेल तर शिक्षणाची वाटही स्पष्ट होते. शिक्षण घेणे आणि ते आपल्या मुलांनाही मिळालेच पाहिजे, हीच खरी भावना असावी, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले.

शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. फारुख आझम यांच्या कन्या तथा नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मिसबाह शेख यांच्या ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’ या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

पुढे बोलताना होशिंग म्हणाले की, डॉ. मिसबाह शेख यांच्या आजोबांनी शिक्षणाची दृष्टी जोपासली, तर त्यांच्या वडिलांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. एका पिढीने शिक्षणाचा वारसा जपला, तर दुसऱ्या पिढीने वैद्यकीय सेवेची परंपरा पुढे नेली आहे.

डॉ. मिसबाह शेख यांचे बालपण अभ्यासू वृत्ती, शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड, एकाग्रता आणि स्वतःशीच स्पर्धा करत यश संपादन करण्याच्या ध्येयाने घडले. इतरांशी तुलना न करता स्वतःची गुणवत्ता सातत्याने वाढवत त्यांनी प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून यश संपादन केले.

संस्कार, जिज्ञासा आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश समाजासाठी प्रेरणादायी असते. एवढे मोठे यश मिळाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवून सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी कार्य करण्याची डॉ. मिसबाह शेख यांची वृत्ती निश्चितच सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या सेवेमुळे सामान्य माणसाचे जीवन अधिक सुखकर होईल, असा विश्वास श्रीकांत होशिंग यांनी व्यक्त केला.


यावेळी बोलताना रमेश गुगळे म्हणाले की,उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाऊन तिकडेच मोठी नोकरी मोठा उद्योग करतांना तरूण लोक दिसतात. मात्र आपल्या गावाचे आपल्या लोकांचे आपण काही देणे लागतो या सामाजिक जाणीवेतुन उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. मिसबाह यांनी जामखेड मध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे ठरविले हे कौतुकास्पद आहे.उच्च शिक्षित डॉ.मिसबाह यांच्या सेवेतून जामखेडचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उंचावर जाईल.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग होते, तर प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या हस्ते क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक जानमोहंम्मद पठाण, जेष्ठ शिक्षिका मुमताज पठाण व नरेंद्र ढाळे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती रमेश गुगळे, मुस्लिम पंच कमिटीचे अझहर काझी तसेच नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मुक्तार सय्यद, नगरसेवक वसिम सय्यद, शामीरभाई सय्यद, हाजी जावेद बारूद, राजू खान, हाजी नादीरभाई, आयुब पठाण, युसुफ शेख, ॲड. अल्ताफ शेख, इंजी. उमर शेख, डॉ. अल्ताफ शेख, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. संजय राऊत, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. सचिन काकडे, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. पांडुरंग सानप, डॉ. सरफराज खान, डॉ. भरत देवकर, डॉ. निखील वारे, डॉ. सागर शिंदे, डॉ. कामरान अत्तार, डॉ. चंद्रकिरण भोसले, पितळे, सिंघवी, संगई,वैभव आंबिलवादे, प्रवीण गा दिया, पै. राजू शेख, हाजी शकूर,लॅब संघटनेचे संजय कोल्हे, महेश यादव, रऊफ सय्यद तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले, तर डॉ. सादेख पठाण यांनी आभार मानले.

————–
*चौकट*
आजच्या घडीला डॉ. मिसबाह शेख या अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ग्लॉकोमा निदान व व्यवस्थापन, मधुमेहजन्य रेटिनोपॅथी निदान, रेटिना तपासणी, लेझर उपचार तसेच चष्म्याचा नंबर तपासणी अशा विविध सुविधा क्लिनिक मध्ये उपलब्ध असणार आहेत. आठवड्याच्या शनिवार व रविवार सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ओपीडी सुरू राहणार आहे. अपॉइंटमेंटसाठी ९४२३४६१०४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page