जामखेडमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट धान्य; रेशनच्या तांदळात कीडे अळ्या व जाळ्या; गरीबांना चांगले धान्य द्या प्रहार संघटना आक्रमक.

जामखेडमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट धान्य; रेशनच्या तांदळात कीडे अळ्या व जाळ्या; गरीबांना चांगले धान्य द्या प्रहार संघटना आक्रमक.

जामखेड प्रतीनीधी

जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरजू आणि गरीब लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. रेशन दुकानांमधून वाटप करण्यात येणाऱ्या तांदूळ आणि ज्वारीमध्ये किडे, जाळ्या, अळ्या आढळत असून धान्याला कुबट वासही येत आहे.

यामुळे गरीब नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा संतापजनक आरोप प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी केला आहे.

शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत (PDS) गरिबांसाठी धान्य पुरवले जाते. मात्र, हे धान्य खाण्यायोग्य नसल्यामुळे ‘या योजनेचा नेमका उपयोग काय?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्याच्या दुष्काळ आणि महागाईच्या काळात हातावर पोट असणाऱ्या व रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक कुटुंबांचे अन्नधान्याचे गणित या सरकारी व्यवस्थेवरच अवलंबून असते. अशा स्थितीत निकृष्ट धान्याचा पुरवठा होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

कल्याणकारी योजनांतर्गत मिळणारे धान्य सुरक्षित, स्वच्छ आणि खाण्यायोग्य असणे ही प्रशासनाची मूळ जबाबदारी आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने याची तातडीने दखल घेऊन संबंधित धान्याची प्रत्यक्ष तपासणी करावी, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि हा निकृष्ट धान्याचा पुरवठा तात्काळ थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

जर प्रशासनाने यात सुधारणा केली नाही, तर प्रहार संघटनेच्या वतीने याहून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नय्युमभाई सुभेदार यांनी दिला आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles