Home राजकीय बातमी महासंग्राम युवा मंचचा सामाजिक उपक्रम; मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान व फिटनेस शिबिर...

महासंग्राम युवा मंचचा सामाजिक उपक्रम; मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान व फिटनेस शिबिर उत्साहात

0
6

महासंग्राम युवा मंचचा सामाजिक उपक्रम; मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान व फिटनेस शिबिर उत्साहात

७८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; शिबिराचे यंदाचे १७ वे वर्ष

जामखेड प्रतिनिधी –

गणेशोत्सवाच्या निमित्ताने महासंग्राम युवा मंच (जामखेडचा राजा) यांच्या वतीने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी लक्ष्मी चौक, खर्डा रोड, जामखेड येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान व फिटनेस शिबिर उत्साहात पार पडले. महासंग्राम युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात सहभागी नागरिकांची रामेश्वर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना औषध-गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले.रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची रक्तदाब, ईसीजी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच उपस्थितांना मोफत फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. वजन कमी करणे अथवा वाढवणे याबाबत तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.शिबिरादरम्यान आवश्यक असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेबाबतही नियोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी रामेश्वर हॉस्पिटल व आयसीयू सेंटर, जामखेड ब्लड बँक तसेच आरोग्य सल्लागार तुकाराम गाडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या सामाजिक उपक्रमाबद्दल महासंग्राम युवा मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मधुकर आबा राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, नगरसेवक महेश दादा निमोणकर, नगरसेवक संजय काका काशीद, मोहन पवार, इस्माईल सय्यद, सागर सदाफुले, विकास मासाळ, गणेश डोंगरे, पवन राळेभात, काका राळेभात, नगरसेवक वसीम सय्यद, राम निमोणकर, श्रीराम काशीद, शंकर इंगळे, विकास राऊत, बालाजी निमोणकर, अक्षय म्हेत्रे, देविदास भादलकर, गणेश काळे, सोमनाथ राऊत, सावता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष मोहोळकर, शंकर लोखंडे, निलेश बिराजदार, अजय गौड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट –

यंदा साधेपणाने गणेश विसर्जन
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर महासंग्राम युवा मंचच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून कोणताही गाजावाजा न करता गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती महासंग्राम युवा मंचचे पदाधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी दिली.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page