• लहानपनापासून मुलांना बचतीची सवयी व्हावी यासाठी एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून अभिनव योजना सुरु

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यात ह एच यू गुगळे परिवाराने कापड, मेडिकल, बायोटेक, चित्रपट सृष्टी, हॉटेल्स, गृहप्रकल्प या माध्यमातून एच यू गुगळे परिवाराने आपलं नाव शहरात व जिल्ह्यात कमावलं आहे, परंतु एक सामाजिक भान जपत आपणही समाजाचं काही तरी देण लागतो म्हणून आणखी एक समाजासाठी चांगली आणि फायदाची योजना घेऊन आले आहेत.एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबविले जातात,पतसंस्थेचे आतापर्यंत 3500 हजार खातेदार आहेत, आणि या पतसंस्थेमध्ये RTGS, NEFT, सोनेतारण कर्ज अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी कर्जपुरवठा करणे तसेच आता सहा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी बचतीची सवय लागावी म्हणून ए. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ही राज्यातील पहिलीच योजना आहे. तसेच  शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींसाठी शैक्षणिक कर्ज योजना देखील सुरु करण्यात आली आहे.आणि असा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आपल्या शहरात राबवण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासून बचतीची सवय लागावी तसेच बँकेचे व्यवहार समजावेत म्हणून उघोगपती रमेश भाऊ गुगळे यांच्या संकल्पनेतून एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून अभिनव योजना राबविण्यात येत आहे तेव्हा या योजनेचा जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले.

भविष्याची चिंता आजपासून कमी करा, तुमच्या खिशात उरलेली एक नोट दररोज तुमच्या पाल्याच्या बचत खात्यात टाका, यामुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल असे सांगण्यात आले.

या योजनेविषयी एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश गुगळे, शाखाधिकारी वैभव कुलकर्णी, श्याम पंडित, जुबेर खान उपस्थित होते.

 

पतसंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत दुर्बल घटकातील अडीच हजार महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. आता सहा ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही अभिनव बचत योजना आणली आहे. या बचतीवर सहा टक्के व्याजही मिळणार आहे तसेच मुलींना वाढीव ६.५ टक्के व्याज मिळणार आहे.

गुंतवणूक करायची असेल तर ती अगदी मोठी रक्कम गुंतवणे गरजेचे असते असे नव्हे. “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी छोटीशी रक्कम जरी गुंतवायला सुरुवात केली तरी तुम्ही काही वर्षानंतर तुमच्या कडे शिक्षणासाठी चांगली रक्कम जमा होईल तेव्हा या योजनेचा लाभ घ्यावा असे रमेश भाऊ गुगळे यांनी सांगितले.

तसेच २६ जानेवारीला या फॅमिली फंड व मुलांसाठी ची बचत योजनेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी खातेदार बालक, पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *