जैन साधूंच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यां व्यक्तींच्या निषेधार्थ जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान मार्फत जामखेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,जगाला अहिंसा, करुणा आणि त्यागाचा मार्ग दाखवणारे जैन साधुसंत आपल्या मार्गावर चालताना देखील सुरक्षित नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत अनेकदा प्रशासनास निवेदन देण्यात आलेले आहे.
राजस्थान मधील पाली येथील अशीच एक भयानक घटना घडलेली आहे. अशा घटना जैन समाजाच्या मनाला वेदना देणाऱ्या असून यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी जामखेड येथील जैन बांधव यांनी जामखेड तहसीलदार माननीय योगेश चंद्रे साहेब यांना निवेदन दिले आहे.
१२ जानेवारी २०२४ रोजी राजस्थान येथील तकठगड जिल्ह्यातील पाली मध्ये जैन साधूवर वाहन चालवण्यात आले . मात्र यावर साधा गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही.
हत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार असताना यात ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे … जैन साधू जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र संसार व भौतिक सुखाचा त्याग करून पायी भ्रमण करतात आणि प्रबोधन व जीवनाचे मार्ग सांगतात यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही यंत्रणा शासन देत नाही. यासाठी आम्ही जामखेड वासिय जैन समाजाने वेळोवेळी तीव्र निवेदने व आंदोलने केली आहेत.
वाहन चालकाने जाणीवपूर्वक संतांवर वाहन चालवण्याचा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. साधुसंत बाजूला असताना चालकाने जाणीवपूर्वक वाहन चालवत असल्याचे स्पष्ट समजते मात्र प्रशासन कडक कारवाई करत नसल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
महत्वाचे म्हणजे जैन साधुसंत हे अहिंसेचा मार्ग पत्करून कार्य करत असतात आणि त्यांनाच अशा अहिंसक कृतीला बळी पडावे लागते याचा खेद वाटतो.. यावेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, अशोक चोरडिया, सुभाष भळगट, कांतीलाल कोठारी , संदीप भंडारी, वैभव कटारिया आदी उपस्थित होते.