जामखेड प्रतिनिधी

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुकीत 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती या दिवशी 144 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 18 जागेसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार व आ.प्रा. राम शिंदे या दोघांच्या पॅनलमध्ये लढत होईल असे चित्र स्पष्ट झाले आहे.


जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते ,मात्र 182 अर्ज वैध ठरले होते
आज शेवटच्या दिवशी १४४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १८ जागेसाठी फक्त ३८ अर्ज शिल्लक राहिलले त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होईल असे स्पष्ट दिसत आहे.


या निवडणुकीत पुढील उमेदवार आपले भविष्य आजमावणार आहेत

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघासाठी २ जागेसाठी 1) शरद कार्ले, 2) वैजीनाथ पाटील, 3) हनुमंत पाटील,4) शरद शिंदे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत


ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ एका जागेसाठी 1) नंदकुमार गोरे, 2) हनुमंत बारगजे हे उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ 1) बबन तुपेरे, 2) सिताराम ससाणे,3) सुनील साळवे हे उमेदवार असतील

सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण ७ जागेसाठी 1)गौतम उतेकर, 2)मच्छिंद्र गिते, 3)सचिन घुमरे, 4)जालिंदर चव्हाण, 5)विलास जगदाळे, 6)सतिश ढगे,7) अंकुश ढवळे,8) तुषार पवार, 9)शहाजी पवार,10)विष्णू भोंडवे, 11)शिवाजी भोसले,12)सुधीर राळेभात, 13)गणेश लटके, 14)वराट कैलास,15)सतिश गिते हे १५ उमेदवार

 

सहकारी संस्था महिला मतदारसंघ २ जागेसाठी 1)रतन चव्हाण, 2)शारदा भोरे, 3)अनिता गिते, 4)सुरेखा शिंदे हे उमेदवार उमेदवार

सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ एका जागेसाठी 1(गणेश जगताप, 2)महादेव डुचे हे दोन उमेदवार

सहकारी संस्था भटक्या जाती जमाती मतदारसंघ एका जागेसाठी 1)नारायण जायभाय, 2)अशोक महारनवर हे दोन उमेदवार
असे सोसायटी मतदारसंघात ११ जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

व्यापारी मतदारसंघ दोन जागेसाठी 1)हरिदास उगलमुगले, 2)सुरेश पवार, 3)राहुल बेदमुथ्था, 4)बोरा महेंद्र हे चार उमेदवार

हमाल मापाडी मतदारसंघ एका जागेसाठी 1)दत्तात्रय खैरे, 2)रविंद्र हुलगुंडे हे दोन उमेदवार असे एकुण १८ जागेसाठी ३८ उमेदवार या निवडणुकीत आपले भविष्य आजमावित आहेत.

या निवडणुकीसाठी आर. एफ. निकम हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे
चिन्ह वाटप – २३ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता (निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)
मतदान – ३० एप्रिल रोजी वेळ सकाळी ८:०० ते ४:००,
स्थळ नंतर घोषित करण्यात येईल

निकाल – ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)
निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. एफ. निकम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *