ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या भगवान दादांवर मोठी जबाबदारी.
डॉ.भगवानदादा मुरुमकर यांची किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.
जामखेड, प्रतिनिधी
गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठपणे व प्रामाणिकपणे काम करणारे तसेच जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवानदादा मुरुमकर यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पक्षु वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून व जामखेड पंचायत समितीचे सभापती आसताना तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांशी डॉ भगवान मुरूमकर यांची नाळ जोडलेली आहे आता राज्यातील आनेक भागात पावसाने पाठ फिरवली आसुन बळीराजा संकटात सापडला आहे त्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मुरूमकर करतील अशी आशा आहे
तसेच त्यांच्या दीर्घकाळच्या पक्षनिष्ठेची संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे जामखेड तालुक्यातील भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी डॉ. भगवानदादा मुरुमकर यांच्या २५ वर्षांच्या निष्ठावान राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून डॉ. मुरुमकर यांची ओळख आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात निवडीचा सोहळा
डॉ. भगवानदादा मुरुमकर यांच्या निवडीचा अधिकृत कार्यक्रम नुकताच मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. मुरुमकर यांचे स्वागत केले व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद दादा काळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय दादा काशीद, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, माजी उपसभापती रवी दादा सुतवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, राहुल चोरगे, भाऊ गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्षमय ते यशस्वी राजकीय प्रवास
डॉ. भगवानदादा मुरुमकर हे जामखेड तालुक्यातील अनुभवी, अभ्यासू आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी सलग पाच वर्षे जामखेड पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले असून, पंचायत समिती सदस्य म्हणूनही दहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच साकत गावचे सरपंच म्हणून पाच वर्षे काम करताना गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची जाण असलेल्या डॉ. मुरुमकर यांची किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे.
त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न शासन व पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर प्रभावीपणे मांडले जातील, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणींना अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल जामखेड तालुका भाजप व पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. भगवानदादा मुरुमकर यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.
![]()
