गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांचा रूट मार्च; जमाव नियंत्रणाचा सराव

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांचा रूट मार्च; जमाव नियंत्रणाचा सराव

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची जय्यत तयारी; शांततेत उत्सव साजरा करण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी :

आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रूट मार्च तसेच जमाव नियंत्रणाचा सराव घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला.जामखेड पोलीस ठाण्यापासून रूट मार्चला सुरुवात करून बीड रोड कॉर्नर, खर्डा चौक, जामखेड बसस्थानक आदी प्रमुख भागांत पोलिसांनी संचलन केले. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचा सराव करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या काळात जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होणार असल्याने बंदोबस्ताची आवश्यकता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यासह अहिल्यानगर येथून अतिरिक्त पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. मुख्यालयातील पोलिसांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, जमाव नियंत्रणासह पोलिसांची भूमिका व नागरिकांशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेशोत्सव व पोळा हे सण सर्वांनी आनंदाने आणि शांततेच्या वातावरणात साजरे करावेत.

कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चौधरी यांनी केले.तसेच ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आणि डीजेच्या वापराबाबत असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कायद्याच्या चौकटीत साजरा करण्यासाठी नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जामखेड पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles