जामखेड तालुक्यात अवकाळीचा फटका, वीज पडून चार जनावरांनाचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी,
गेल्या चार पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच दि १७ एप्रिल रोजी सायंकाळी जामखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चार जणावरांचा वीच पडुन मृत्यू झाला आहे. तहसीलदार गणेश माळी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

 
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुक्यातील आनेक भागात बुधवार दि १७ एप्रिल रोजी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

 
याचा फटका जामखेड तालुक्याला देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. दोन दिवसांपूर्वी साकत येथे पांडुरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्यू झाला होता. तसेच १७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कुसडगाव येथील बिभीषण रामचंद्र भोरे यांची गाय, जवळके येथील अंकुश वाळुंजकर यांची गाय, दादासाहेब हाडोळे यांचा बैल तर भुतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहे.

 
दोन गायी, एक बैल व एक वासरू सह फळपीकांचेही काही भागात नुकसान झाले आहे. वीजेच्या कडकडाटामुळे जामखेड शहरातील लाईटही पाच ते सहा तासांपासून बंद होती. अनेक ठिकाणी झाडांवर वीजा पडलेल्या आहेत यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद पडलेली आहेत. तहसीलदार गणेश माळी यांनी नुकसानग्रस्त पिकांचे शेतकऱ्यांचे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *